ETV Bharat / state

Solapur Third In state : प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा - सांस

सार्वजनिक आरोग्य सेवा (Public health services) प्रशासनाच्या वतीने राज्यस्तरीय 2021- 2022 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यात सोलापूर जिल्ह्याने प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये ( Reproductive and Child Health Program) राज्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला (Solapur District Third in state) आहे. जिल्ह्यात कोविडचा संसर्ग (Infection with covid) मोठा असतानाही वेळीच आरोग्य सेवा देण्यामध्ये आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे.

Solapur District Third in State
सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा
author img

By

Published : May 15, 2022, 6:54 PM IST

सोलापूर: सोलापूर जिल्हा भौगोलिक व लोकसंख्येने मोठा असताना तसेच आरोग्य यंत्रणेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून हे यश संपादन केल्याची माहिती सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत १२ आठवड्याच्या आत गरोदर माता नोंदणी करणे. गरोदर मातेची तपासणी तसेच त्यांचे संदर्भ सेवा देणे.बालकांचे लसीकरण करणे.बालकांच्या संदर्भसेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत बालकांच्या तपासण्या करणे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार माझे मुल माझी जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे राबविली. कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही कोविड लसीकरणा बरोबरच आरोग्य विभागाच्या टीमने या पण सेवा उत्तम रित्या लाभार्थ्यांना दिल्या.

मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी अति जोखमीच्या गरोदर मातांचा पाठपुरावा केला. त्यांचे रक्तक्षय जंतदोषावर उपचार केले. सोनोग्राफीची मोफत सेवा दिली. गरोदर मातांच्या रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात आल्या.संस्थेत प्रसुती झाल्यास जेवणाची सोय तसेच सदर लाभार्थ्याला घरी सोडण्याच्या सोयीसह प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभ मिळवून दिला.लक्ष्य (LAKSHYA) या कार्यक्रमांतर्गत अद्यावत प्रसूती कक्ष तसेच सांस (SAANS) कार्यक्रमाअंतर्गत सर्व आशा व आरोग्य कर्मचारी यांना न्युमोनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे प्रशिक्षण देऊन माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रशिक्षित करण्यात आले.

कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर कोविड व्यतिरिक्त आरोग्य सेवा देण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. आरोग्य विभागाने नियोजनपूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याचे फळ आज मिळाले आहे. मी माझ्या सर्व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. भविष्यकाळात लोकसहभागातून अजून जास्त प्रभावीपणे सेवा देण्यावर भर राहील.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ज्यात जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या समन्वयाने तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यासह इतर विभागाचाही सहभाग घेऊन दर्जेदार आरोग्य सेवा देण्यामध्ये व जनजागृती करण्यात सोलापूर जिल्हा परिषद यशस्वी ठरली आहे.

हेही वाचा : Exam Fever 2022 - सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत दररोज दोन पेपर; ऑफलाईन परीक्षेवर विद्यापीठ प्रशासन ठाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.