सोलापूर - शहर व जिल्हा मिळून कोरोनाबाधितांच्या संख्येने आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी रात्रीपर्यंतची संख्या 8 हजार 135 एवढी होती.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसभरात 2 हजार 577 अहवाल प्राप्त झाले. 230 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सोलापुरात 121 जणांना कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोलापूर शहरात 473 अहवाल प्राप्त झाले यामधून 435 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 38 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.शहरात चार रुग्णांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. तर 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर ग्रामीण भागामध्ये बुधवारी 1 हजार 104 अहवाल प्राप्त झाले.त्यामधून 912 अहवाल निगेटिव्ह आले आहे. ग्रामीण भागात बुधवारी192 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .तर 7 रुग्णांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागांमधून 74 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहर व जिल्ह्यातील एकूण स्थिती
शहर 4823
ग्रामीण 3312
एकूण 8135
मृत्यू
शहर 356
ग्रामीण 96
एकूण 452