ETV Bharat / state

इंदापुराला 5 टीएमसी पाणी पळवल्याच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांच्या विरोधात सर्वपक्षीय वज्रमुठ; 1 मे रोजी उजनीत जलसमाधी आंदोलन

author img

By

Published : Apr 28, 2021, 9:43 PM IST

पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या निषेधार्थ उजनी धरणात 1 मे रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय उजनी पाणी बचाव संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सोलापूरला राखीव असलेल्या उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील (पुणे) 22 गावांना पाणी वळविण्यात आले आहे.

सोलापूर
सोलापूर

सोलापूर - उजनीचे पाणी इंदापूर तालुक्याकडे वळविणाऱ्या पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या निषेधार्थ उजनी धरणात 1 मे रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय उजनी पाणी बचाव संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सोलापूरला राखीव असलेल्या उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील (पुणे) 22 गावांना पाणी वळविण्यात आले आहे. याविरोधात कुर्डवाडी येथे सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित येत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे विरोधात वज्रमूठ केली आहे.

सोलापूर

सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व करणारे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवले आहे.याचा निषेध म्हणून 1 मे महाराष्ट्र दिनी सोलापूर येथे त्यांनी झेंडा फडकवू नये.अशी मागणी उजनी पाणी बचाव समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्र्यानी सोलापुरात झेंडा फडकवल्यास या पाणी चाेरीचा निषेध म्हणून उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे सदस्य उजनी धरणामध्ये जल समाधी घेणार असल्याचा इशारा पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी राखीव असलेले पाणी इंदापूरकडे वळविले-

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी ५ टीएमसी पाणी नेणारी योजना मंजूर केली आहे.सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इंदापूरला वळवणार असल्याने याला विरोध करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापन करण्यात आली.या संघर्ष समितीच्या नेतृत्वा खाली भविष्यात दीर्घकालीन लढा लढण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले.

सोलापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार व उसाचे क्षेत्र देखील कमी होणार -

यावेळी बैठकीत जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख म्हणाले,की सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरील अनेक पाणी पुरवठा योजना निधी अभावी रखडलेल्या आहेत.उजनी धरणातील पाण्याचे १०० टक्के वाटप पूर्ण झालेले आहे.धरणात पाणी शिल्लक नसताना सुद्धा इंदापूरला पालकमंत्री भरणे यांनी पाणी घेऊन गेले आहे.यामुळे भविष्यात जिल्हा वासियांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.या मुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते.या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्या साठी रस्त्यावर उतरले पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.