सोलापूर- जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक एकमेकांपासून दूर पळत असल्याचे चित्र आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 548 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 5329 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात 5194 अहवाल प्राप्त झाले असून यातील 4781 निगेटिव्ह तर 548 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. 159 अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. रुग्णालयातून कोरोनामु्क्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या 224 असून 252 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मृतांची संख्या 40 वर पोहोचली असून यात 26 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे.
शुक्रवारी 6 कोरोनाबाधित मृत झाल्याचे जाहीर करण्यात आले. मृतांमध्ये 5 पुरुषांचा आणि एका महिलेचा समावेश आहे. पाचेगांव सांगोला येथील 64 वर्षीय पुरूष, कुर्बान हुसेन नगर येथील 58 वर्षीय पुरूष, तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 72 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देगांव रोड परिसर सलगरवस्ती येथील 55 वर्षीय पुरूष, जुळे सोलापूर सिध्देश्वर नगर येथील 46 वर्षांचा पुरष आणि मराठा वस्ती भवानी पेठ येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरातल्या या परिसरात आढळले नवे रुग्ण-
नई जिंदगी 1 महिला | कुमठा नाका 1 पुरूष,1 महिला | नीलम नगर 3 पुरूष,6महिला |
नई जिंदगी शोभा देवी नगर 1पुरूष | मिलिंद नगर बुधवार पेठ 1 पुरूष | शिवशरण नगर एमआयडीसी 1 महिला |
सातरस्ता 1 पुरूष | लोकमान्य नगर 3 महिला | पुणे नाका 1 पुरूष |
मुरारजी पेठ 2 पुरूष,1 महिला | जगदंबा नगर 1 पुरूष | हैदराबाद रोड सोलापूर 1 पुरूष |
उपरी ता. पंढरपूर 1 पुरूष | मराठावस्ती भवानीपेठ 1 महिला | कर्णिकनगर 1 पुरूष |
वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.