ETV Bharat / state

स्वच्छता उपकर रद्द करा; सिटू व माकपच्या वतीने आंदोलन

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना 1 सप्टेंबरपासून स्वच्छता उपकर म्हणून 50 रुपये लावला जाणार आहे. हा कर रद्द करावा, या मागणीसाठी सिटू आणि माकपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

situ agitation on behalf of CPI (M) demanding abolition of sanitation cess
स्वच्छता उपकर रद्द करा; सिटू व माकपच्या वतीने आंदोलन
author img

By

Published : Sep 5, 2020, 5:35 PM IST

सोलापूर - महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना 1 सप्टेंबरपासून स्वच्छता उपकर म्हणून 50 रुपये लावला जाणार आहे. त्या विरोधात सिटूच्या वतीने शनिवारी 5 सप्टेंबर रोजी घरोघरी जात, गल्ली बोळामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम व सिटूचे अ‌ॅड एम. एच. शेख यांनी महापालिका विरोधात जोरदार निदर्शने करत या उपकराविरोधात जोरदार भाषण करत विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यात नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

आधीच लॉकडाऊनमुळे शहरवासियांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांची रोजगार गेले आहेत. हातामध्ये पैसा नाही. उत्पन्न बुडाले आहे. त्यात सोलापूर महानगरपालिका स्वच्छता उपकर म्हणून अधिकचे 50 रुपये वसूल करण्याच्या तयारीत आहे. 1 सप्टेंबरपासून शहरातील नागरिकांना स्वच्छता उपकरचे भुर्दंड सोसावे लागणार आहे. वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिका सोलापुरातील नागरिकांकडून दरवर्षी विविध मार्गाने कर वसुली करते, त्यामध्ये स्वच्छता कर असताना देखील अधिकचे 50 रुपये कुठून द्यायचे, असा सवाल माजी आमदार आडम यांनी उपस्थित करून शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना उद्देशून भाषण केले.

स्वच्छता उपकर रद्द करा...

आज (शनिवार ता. 5 सप्टेंबर) देशातील शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित कामगार, महिला, युवा, विद्यार्थी आदींनी एकत्रित येऊन विविध न्याय हक्काच्या मागणीसाठी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी व्यपक आंदोलनाद्वारे मागणी दिवस पाळण्यात आला. त्या अनुषंगाने सोलापुरात माकपच्या वतीने व सिटू यांच्या वतीने संयुक्तरित्या नरसय्या आडम व सिटूचे अ‌ॅड एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शहर व ग्रामीण भागात जोरदार आंदोलन करण्यात आले.

शहरातील अशोक चौक, स्वागत नगर, गांधी नगर, एमआयडीसी, लष्कर, शास्त्री नगर, राहुल गांधी नगर, आदर्श नगर, मित्र नगर, भैय्या चौक, नरसिंग गिरजी चाळ, जुनी मिल चाळ, विडी घरकुल, कुंभारी, बापूजी नगर, दत्त नगर, रंगभवन, कुर्बान हुसेन नगर आदी भागातील नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

हेही वाचा - अखेर..! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांचा मुहूर्त मिळाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.