ETV Bharat / state

पंढरपूरच्या विठ्ठलाला पुसदचे दान; भाविकाकडून दहा तोळे सोने अर्पण - pandharpur news

पुसद गावामधील श्रीराम कोंडोपंत पापेनवार यांना विठ्ठलाला सोने दान स्वरूपात अर्पण करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांना अर्धांगवायूचा आजार असल्यामुळे पंढरपूरला येणे शक्य नसल्याने स्वत: मंदिर समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजोबांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांच्या घरी जाऊन दहा तोळे सोने दान स्वरूपात स्वीकारले.

पुसद
श्रीराम कोंडोपंत पापेनवार
author img

By

Published : Dec 21, 2019, 8:22 AM IST

सोलापूर - मला चालता येत नाही. परंतु, श्री विठ्ठलाला माझ्याच हाताने दागिने अर्पण करायचे आहेत. अशी इच्छा यवतमाळ जिल्ह्यामधील पुसद गावातील अर्धांगवायू झालेल्या आजोबांनी आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली. आजोबांच्या इच्छापूर्तीसाठी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आजोबांच्या घरी जाऊन दहा तोळे सोने दान स्वरूपात स्वीकारले.

प्रतिक्रिया देताना मंदिर समितीचे लेखाधिकारी

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद गावामधील श्रीराम कोंडोपंत पापेनवार यांना विठ्ठलाला सोने दान स्वरूपात अर्पण करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांना अर्धांगवायूचा आजार असल्यामुळे पंढरपूरला येणे शक्य नव्हते. त्यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी भजनावळे यांच्यामार्फत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीशी संपर्क साधून आपली इच्छा कळवली. त्यानुसार मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम व विनोद पाटील हे पापेनवार यांच्या घरी पोहोचले. तेव्हा पापेनवार यांनी दहा तोळे सोने त्यांच्याकडे सुपूर्द केले.

त्यानंतर ते सोने विठ्ठलाच्या चरणावर ठेऊन मंदिर समितीकडे जमा करण्यात आले, अशी माहिती मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांनी दिली.

Intro:mh_sol_03_100_gram_gold_to_vitthal_7201168

श्री विठ्ठलास १० तोळे सोने अर्पण, पुसद येथील भाविकांने सोनं केलं अर्पण

सोलापूर-

मला चालता येत नाही, परंतु श्री विठ्ठलाला माझ्याच हाताने दान करायचे आहे अशी इच्छा पुसद जिल्हा यवतमाळ येथील गावातील अर्धांगवायु असलेल्या आजोबांनी कुटुंबीयांकडे व्यक्त केली अन मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आजोबा च्या घरी जाऊन दान स्वरूपात दहा तोळे सोने स्वीकारले.Body:यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील श्रीराम कोंडोपंत पापेनवार यांना विठ्ठलाला दान करण्याची इच्छा होती. मात्र त्यांना अर्धांगवायूचा आजार असल्यामुळे पंढरपूर येणे शक्य नव्हते.
त्यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी भजनावळे यांच्यामार्फत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीशी संपर्क साधून पापेनवार यांची इच्छा कळवली. त्यानुसार मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम व विनोद पाटील हे पापेनवार यांच्या घरी पोहोचले. तेव्हा पापेनवार यांनी दहा तोळे सोने त्यांच्याकडे सुपूर्द केले.
त्यानंतर त्यांनी ते सोने विठुरायाच्या चरणावर ठेऊन ते मंदिर समितीकडे जमा करण्यात आले अशी माहिती मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांनी दिली.
....................

Bite _सुरेश कदम
(मंदिर समिती लेखाधिकारी)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.