ETV Bharat / state

सोलापूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा, दोन दिवस लसीकरण राहणार बंद

author img

By

Published : Apr 27, 2021, 8:18 PM IST

सोलापूरमध्ये कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे, लस संपल्याने सोलापूरमधील अनेक केंद्रांवरील लसीकरण थांबवाने लागले आहे. दरम्यान लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत, मात्र लस संपल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच परत जावे लागले.

सोलापूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा
सोलापूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा

सोलापूर - सोलापूरमध्ये कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे, लस संपल्याने सोलापूरमधील अनेक केंद्रांवरील लसीकरण थांबवाने लागले आहे. दरम्यान लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत, मात्र लस संपल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच परत जावे लागले.

सोलापूर शहराला पुणे येथील औषध भांडारकडून रविवारी 5 हजार लसी प्राप्त झाल्या होत्या. सोलापूरमध्ये एकूण सात केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढल्याने सोमवारी दुपारपर्यंतच या लसी संपल्या. त्यामुळे अनेकांना लस न घेताच परत जावे लागले.

सोलापूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा

लसीकरण दोन दिवस राहाणार बंद

सोलापूरमधील लसीचा साठा सोमवारीच संपल्याने शहरातील लसीकरण सध्या बंद आहे, मात्र तरी देखील आपल्याला लस मिळेल या अशेने अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर हजेरी लावत आहेत. मात्र लस संपल्याने आता पुढील दोन दिवस लसीकरण बंद राहाणार आहे.

लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टन्सचा फज्जा

दरम्यान लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिक गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना पिण्याच्या पाणी सोय देकील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच अनेक वेळा केंद्रांवर वाद देखील होत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - कोरोनावरील लसीचे उत्पादन आपल्याकडे, तरीही लस महाग कशी - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.