सोलापूर - सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संतोष भोसले यांनी सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी हे ऐकत नाहीत. शहरातील सुरळीत पाणी पुरवठा केला जात नाही, असा आरोप करत शोले स्टाईल आंदोलन केले. प्रशासन आणि सत्तेत असलेले पदाधिकारी यांच्या विरोधात भाजपच्या नगरसेवकाने रोष व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यापासून सोलापूर शहरात पाच ते सहा दिवसातून एकदा पिण्याचे पाणी येते. याबाबत संतोष भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.
ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत
संतोष भोसले हे प्रभाग 16 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रभागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने ते संतप्त झाले होते. महापौर आणि पालिका अधिकाऱ्यासमोर पाणी पुरवठ्याचा विषय मांडूनही पाण्याची समस्या सुटत नाही. अधिकारी वर्ग पाण्याचा राजकारण करत आहेत, असा आरोप करत ऐन सणासुदीला पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे संतोष भोसले यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
सोशल मीडियावर आत्महत्या करण्याचा संदेश देऊन चढले टाकीवर
नगरसेवक संतोष भोसले यांनी सोशल मीडियावर संदेश पाठविला. आपल्या प्रभागात ऐन सणासुदीला पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, आता मी,पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारून आत्महत्या करणार आहे, असा संदेश सोशल मीडियावरुन दिला. दुपारच्या सुमारास ते सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करत असताना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन गुन्हा दाखल केला.
डेंग्यूमुळे अनेकांचे जीव गेले, निदान दोन दिवस आड पाणी पुरवठा करावा
सध्या संपूर्ण सोलापूर शहर डेंग्यूची साथ पसरली आहे. माझ्या प्रभागातील अनेक लहान मुलांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. पाच दिवस आड पाणी पुरवठा होत असल्याचे पाणी साठवून ठेवावे लागले. परिणामी डेंग्यूचे प्रमाण शहरात वाढत आहे. त्यामुळे निदान दोन दिवस आड पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यावेळी नगरसेवक संतोष भोसले यांनी केली.
हेही वाचा - वारकऱ्यांना मिळणार पाच हजार रुपये मानधन, अमित देशमुख यांची घोषणा