ETV Bharat / state

पीक विम्यासाठी शिवसेना सरसावली, सोलापुरात तालुक्याच्या ठिकाणी उभारली मदत केंद्रे

पंढरपुरातील केबीपी कॉलेज रोड, विठ्ठल रुग्णालयाशेजारी सुरु करण्यात आलेल्या मदत केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.

पीक विम्यासाठी शिवसेना सरसावली, सोलापूरातील तालुक्याच्या ठिकाणी उभारली मदत केंद्र
author img

By

Published : Jun 22, 2019, 7:52 PM IST

सोलापूर- दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली. पंढरपुरातील केबीपी कॉलेज रोड, विठ्ठल रुग्णालयाशेजारी सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.

पीक विम्यासाठी शिवसेना सरसावली, सोलापूरातील तालुक्याच्या ठिकाणी उभारली मदत केंद्र

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार व शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने मदत केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.

या मदत केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीकविमा योजना व छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी करमाळा, माढा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी या मदत केंद्राच्या माध्यमातून अर्ज दाखल करावेत, असे आवाहन संभाजी शिंदे यांनी केले आहे.

Intro:R_MH_SOL_22_JUNE_2019_SHIVSENA_MADAT_KENDRA_S_PAWAR
पीक विमा योजनेसाठी शिवसेनेची मदतकेंद्र,
प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देणार
सोलापूर-
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पिक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवसेेनेच्या माध्यमातून मदत केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहीती शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.Body:पंढरपूरात केबीपी कॉलेज रोड,विठ्ठल हॉस्पिटल शेजारी शिवरत्न कॉम्प्लेक्स येथे हे सुरु करण्यात आलेल्या मदत केंद्राचे उदघाटन आज करण्यात आले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी असे आदेश दिले होते.या आदेशानुसार व शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख ना.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने मदत केंद्रे स्थापन करण्यात येत असल्याची माहीती शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
तरी या मदत केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिकविमा योजना व छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी करमाळा,माढा,पंढरपूर,माळशिरस,सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी शिवसेनेच्या या मदत केंद्राच्या माध्यमातून अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Conclusion:Bite:- संभाजी शिंदे
(शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.