सोलापूर- सध्या उजनीच्या पाण्यावरून राजकारण पेटले आहे. पाण्यावरून इंदापूर आणि सोलापूरमधील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते, शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते हे उजनी पाणी प्रश्नावरून पालकमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे माजी आमदार व माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनीदेखील उजनी धरणातील एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही त्यासाठी रक्त सांडू अशी टोकाची भूमिका घेतली आहे.
उजनीच्या पाण्यासाठी रक्त सांडू, पण पाणी जाऊ देणार नाही - उजनी धरण लेटेस्ट न्यूज
उजनी धरणामधील 5 टीएमसी पाणी इंदापूर(पुणे) तालुक्यातील 23 गावांना मिळणार आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यात राजकारण तापले आहे. याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि इतर राजकीय पक्ष देखील एकवटले आहेत.
![उजनीच्या पाण्यासाठी रक्त सांडू, पण पाणी जाऊ देणार नाही uttamprakash khandare](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11800486-83-11800486-1621312443473.jpg?imwidth=3840)