ETV Bharat / state

शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली -प्रवीण दरेकर - शिवसेनेचे हिंदुत्व दरेकर

काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होते. ( Mahavikas Aghadi Government of Maharashtra ) मात्र, आता शिवसेनेचा केंद्रबिंदू हे गांधी घराणे झाला आहे. त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे. ( Pravin Darekar criticizes Mahavikas Aghadi government ) अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

author img

By

Published : Dec 8, 2021, 7:39 AM IST

सोलापूर - देवेंद्र फडणवीसांवर असे शंभर खटले टाका, महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वर्ष निष्कलंक कारकीर्द कुठलाही मुख्यमंत्री आत्तापर्यंत करू शकला नाही. ( Fadnavis alleged non-disclosure criminal cases registered against election affidavit 2014. ) त्यामुळे आत्तापर्यंत एक रुपयाचा डागही त्यांच्या चारित्र्यावर लागलेला नाही. या सर्वांचे उत्तर न्यायालय योग्यवेळी देईलच, त्यामुळे अशा खटल्यांना आम्ही भीक घालत नाही, ( Court Frames Charges Against Devendra Fadnavis ) अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. दरेकर हे एका लग्ना समारंभासाठी मंगळवारी (दि. 7 डिसेंबर)रोजी सोलापुरात आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पत्रकार परिषद

शिवसेनेचे केंद्रबिंदू गांधी घराणं झालं आहे

काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. ( Hindutva by Shiv Sena ) अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होते. मात्र, आता शिवसेनेचा केंद्रबिंदू हे गांधी घराणे झाला आहे. त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे. ( Congress, NCP, Shiv Sena ) शिवसेना या अगोदरच काँग्रेसबरोबर गेली आहे. आता ती यूपीएत गेली तर काही मोठा फरक पडणार नाही. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिली आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळणार

महाविकास आघाडी सरकार हे दीर्घकाळ टिकू शकत नाही. सरकारमध्ये असणारा विसंवाद हा प्रशासनामध्येसुद्धा आहे. त्यामुळे राज्याचा विकास एक इंचही पुढे जात नाही. त्यामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. तीन पक्षांचे हे सरकार आपापल्यातील विसंवाद आणि आंतरिक विरोधातून शंभर टक्के कोसळणार आहे.

गिरीश कुबेरावरील हल्ल्याचा समर्थन

सावरकरांवरचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रेम हे बेगडी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी साहित्य संमेलनाला दुरून नमस्कार केला आहे. विचारवंत, पत्रकार, लेखकांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते, त्यामुळे त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहिजे. जर अशा लोकांना बेमालूमपणे समाजाच्या भावना बिघडवल्या, श्रद्धास्थानांवर लिहिलंत तर ऍक्शनला रिऍक्शन मिळते. त्यामुळे गिरीश कुबेरांवरील हल्ला ही ऍक्शनला रिऍक्शन होती, अशा स्वरूपात ती करायला नको होती, असं म्हणतं प्रवीण दरेकरांनी संभाजी ब्रिगेडने केलेल्या कृतीचं अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे.

हेही वाचा - संजय राऊत, राहुल गांधी यांची बैठक संपली; काँग्रेसशिवाय युतीबाबत राऊत म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.