ETV Bharat / state

भाजपच्या अंहकारी नेतृत्वाकडे मुळप्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची किमया - शत्रुघ्न सिन्हा

सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कुमठा नाका येथे जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिंहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

शत्रुघ्न सिन्हा
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:22 PM IST

सोलापूर - देशातील आर्थिक मंदी, भुकबळी आणि बेरोजगारी या गंभीर प्रश्नांपासून देशवासीयांच लक्ष विचलित करण्याची किमया अहंकारी नेतृत्वाने साधली आहे, अशी टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता सिन्हा यांनी सोलापुरातल्या सभेत सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा खरपूस समाचार घेतला.

जाहीर सभेत बोलताना शत्रुघ्न सिन्हा

सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कुमठा नाका येथे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिंहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

सिन्हा म्हणाले, आधी नोटबंदी आणून मग जीएसटी लादून देशाची वाट लावली आणि आता फक्त बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक, 370 कलम लागू केल्याचे भांडवल केले जात आहे. सभेच्या सरतेशेवटी त्यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, भूकबळी या प्रश्नांकडे लक्ष वेधताना भूकबळीच्या बाबतीत जगातल्या 117 देशांत भारताचा 102 वा क्रमांक लागतो. तर, पाकिस्तान, बांग्लादेश सारखे देश नव्वदीच्या घरात असल्याची टीका त्यांनी केली. या सभेच्या निमित्ताने शत्रुघ्न सिन्हा यांनी एक प्रकारे सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. आता, त्याला मतदार किती गंभीरपणे घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

हेही वाचा - आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा; रश्मी बागल यांना मोठा धक्का

हेही वाचा - भालके की परिचारक; कोण होणार पंढरीचा राजकीय संत?

Intro:सोलापूर : देशांसमोरच्या आर्थिक मंदी,भूकबळी आणि बेरोजगारी या गंभीर प्रश्नांपासून देशवासीयांचं लक्ष विचलित करण्याची किमया अहंकारी नेतृत्वानं साधली आहे.अशी टीका शॉटगन अर्थात शत्रुघ्न सिन्हा यांनी केलीय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नांव न घेता सिंहा यांनी सोलापुरातल्या सभेत सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा समाचार घेतला.

Body:सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कुमठा नाका इथं जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिंहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यावेळी सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.... आधी नोटबंदी आणून मग जीएसटी लादून देशाची वाट लावली आणि आता फक्त बालाकोट,सर्जिकल स्ट्राईक, 370 कलम लागू केल्याचं भांडवल केलं जातं आहे. अशी टीकाही सिन्हा यांनी भाजप नेत्तुत्वावर केली.

Conclusion:सरतेशेवटी त्यांनी आर्थिक मंदी,बेरोजगारी, भूकमरी या प्रश्नांकडे लक्ष वेधताना भूकबळीच्या जगातल्या 117 देशांत भारताचा 102 नं लागतो अन पाकिस्तान अन बांग्लादेश नवदीच्या घरात असल्याची टीका केली....
या सभेच्या निमित्ताने शत्रुघ्न सिन्हा यांनी एक प्रकारे सरकारच्या कारभाराची पोलखोल केलीय...त्याला मतदार किती गंभीरपणे घेतात. हे लवकरच स्पष्ट होईल...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.