ETV Bharat / state

'आठवलेंचा एकही आमदार किंवा खासदार नाही, त्यामुळे त्यांच्या मताला किंमत नाही' - Sharad Pawar criticizes Ramdas Athawale

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पंढरपुरात आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची पवार भेट घेण्यासाठी आले. पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Sep 29, 2020, 3:19 PM IST

Updated : Sep 29, 2020, 4:02 PM IST

सोलापूर (पंढरपूर) - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही त्यामुळे त्यांच्या मताला किंमत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी आठवले यांची खिल्ली उडवली. शरद पवारांनी एनडीएसोबत यावे त्यांना जास्त चांगले पद मिळेल, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी केले होते.

महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपकआबा साळुंखे उपस्थित होते.

खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपाने केली आहे. त्यामुळे दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी पवारांनी मारली. देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या. मात्र, त्यांचा तपासाची दिशा भरकटल्याचे दिसत आहे, असे ते म्हणाले.

कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्वांनी मिळून या विधेयकाला विरोध करावा, असे आवाहन पवार यांनी केले.

महाविकास आघाडी सरकारला भीती नाही -

खासदार संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटीचा महाविकास आघाडीशी संबंध नाही. संजय राऊत हे सामना वर्तमानपत्राचे संपादक आहेत. सर्वत आधी माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपाच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. महाविकास आघडीचे सुरक्षित आहे. हे सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Sep 29, 2020, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.