सोलापूर - दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मरकज या धार्मीक सोलापूरातील 17 पैकी 11 जणांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये भरती केले आहे. 11 जणांना कोरोना वार्डात दाखल केले असून, त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
दिल्ली येथील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 17 जण सहभागी झाल्याची माहिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. या यादीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने 17 पैकी 11 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांना पुढील उपचारासाठी कोरोना वार्डात दाखल केले आहे. उर्वरित 6 जण हे जिल्ह्यात आलेले नाहीत. ते ज्या ठिकाणी आहेत. त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची माहिती देण्यात आलेली आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांनी देखील या मरकजमध्ये दाखल झालेल्या 14 जणांना ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली आहे.