ETV Bharat / state

राज्य शिक्षण समितीवर रणजितसिंह डिसले अन् कादर शेख यांची निवड

राज्य शिक्षण विभागाकडून उपक्रमशील शिक्षक व अधिकारी विचार गट स्थापन केला आहे. त्या गटांमध्ये माढा येथील ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले व महानगरपालिका प्रशासन अधिकारी कादर शेख यांची निवड करण्यात आली आहे.

Ranjit Singh Disale
रणजितसिंह डिसले
author img

By

Published : Mar 6, 2021, 3:23 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - राज्य शिक्षण विभागाकडून उपक्रमशील शिक्षक व अधिकारी विचार गट स्थापन केला आहे. त्या गटांमध्ये माढा येथील ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले व महानगरपालिका प्रशासन अधिकारी कादर शेख यांची निवड करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागामध्ये शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा म्हणून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्यातून समितीवर तीस जणांची निवड

जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डीसले व महापालिका अधिकारी कादर शेख यांच्यासह शिक्षण विभागाकडून नवीन संकल्पना असणाऱ्या तीस जणांची समितीवर निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष शिक्षण आयुक्त विशाल साळुंखे असून उपाध्यक्षपदी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणून दिनकर टेमकर हे कामकाज पाहणार आहेत. सचिव म्हणून शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे आयटीचे प्राचार्य विकास गरड हे असणार आहे.

शिक्षण विभागात नवीन तंत्रांचा वापर वाढवण्यासाठी समिती स्थापन

राज्यातील शिक्षण क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शिक्षण विभागाकडून उपक्रमशील शिक्षक व अधिकार यांचा विचार गट स्थापन केला आहे. या समितीमध्ये शिक्षक व अधिकारी नवीन उपक्रमशील तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण विभागात कसा करता येईल. याचा विचार केला जाणार आहे. यामुळे राज्य शिक्षण विभागात अमुलाग्र बदल करण्यात मदत होणार आहे.

हेही वाचा - गुटखा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, चार टपऱ्या सील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.