ETV Bharat / state

सोलापूर : कोरोना नियमांचे पालन करत ग्रामीण भागातील शाळा सुरू; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह - पंढरपूर ताज्या बातम्या

राज्य सरकारकडून चार ऑक्टोंबर रोजी शाळा उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार काल पासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शाळेची घंटा आज वाजली. बहुतांश ग्रामीण भागातील शाळांकडून कोरोनाची नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला.

Malshiras School news
Malshiras School news
author img

By

Published : Oct 5, 2021, 8:18 AM IST

Updated : Oct 5, 2021, 9:17 AM IST

पंढरपूर - गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. राज्य सरकारकडून चार ऑक्टोंबर रोजी शाळा उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार काल पासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शाळेची घंटा आज वाजली. बहुतांश ग्रामीण भागातील शाळांकडून कोरोनाची नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये माळशिरस शहरातील श्रीनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शाळेकडून विशेष तयारी करण्यात आली होती. ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांनी फुलून गेलेल्या दिसल्या.

प्रतिक्रिया

शाळांकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन -

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे नवीन रूप पाहावयास मिळाले, तर राज्य सरकारकडून शिक्षण उत्सव सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष बसण्याची सोय करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना कोरोना नियमांची माहिती देण्यात आली. मास्क वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर परिपूर्ण वापर करणे याची माहितीही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली.

शाळेची सोमवारी पहिली घंटा वाजली -

सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांची पहिली घंटा दीड वर्षानंतर वाजवण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दीड वर्षापासून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून अभ्यास केला होता. माळशिरस तालुक्यातील श्रीनाथ विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची विशिष्ट सोय करण्यात आली होती, तर आज शिक्षकांनीही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना अभ्यासावर जोर न देता हसत खेळत वर्गाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना व मित्र-मैत्रिणींनाही भेटता आले. त्यामुळे आता सुरू असलेली शाळा अशीच सुरू राहावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

ग्रामीण भागातील शाळेकडून स्वच्छतेवर भर -

राज्य शासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत ग्रामीण भागातील शाळेने परवानगी दिली आहे. गेल्या दीड वर्षापासून ग्रामीण भागातील शाळा बंद अवस्थेत होते. शाळेतील वर्गांची सफाई करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी विशेष पाण्याची सोय केल्याचे दिसून आले. शाळेचे निर्जंतुकीकरण करून घेणे त्याचप्रमाणे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडावे यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले शाळा प्रशासनाकडून शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे शाळेतील अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

हेही वाचा - संवेदनशील पंतप्रधानांनी लखीमपूरच्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नये, याचे आश्चर्य वाटते - सामना

Last Updated : Oct 5, 2021, 9:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.