ETV Bharat / state

....आणि पंढरपुरात पुन्हा एकदा भरली शाळा - लोकमान्य प्रशाळा पंढरपूर

पंढरपूर येथे एक वेगळीच शाळा सुरू झाली. शाळेत जाऊन मुलांना दंगा करता आला, एकत्र डबा खाता आला, सुमारे आठ महिन्यानंतर शाळेत मनसोक्त खेळताही आले, गप्पा मारता आल्या. हे सगळं एकत्र जुळून आलं ते चंद्रभागेतील पुरामुळे...

School open Pandharpur
पंढरपूरात भरली शाळा
author img

By

Published : Oct 17, 2020, 1:59 PM IST

पंढरपूर - पंढरपूर येथे एक वेगळीच शाळा सुरु झाली. शाळेत जाऊन त्या मुलांना मस्त दंगा करता आला, एकत्र डबा खाता आला, सुमारे आठ महिन्यानंतर शाळेत मनसोक्त खेळताही आले, गप्पा मारता आल्या. हे सगळं एकत्र जुळून आलं, ते चंद्रभागेतील पुरामुळे. चंद्रभागेतील पुरामुळे स्थलांतरी कुटुंबातील मुलांनी पंढरपूर येथील लोकमान्य प्रशाळेत एकत्र शाळा भरवली.

अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. नीरा व भीमा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह 4 हजार कुटुंबातील 16 हजार नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर, काही कुटुंबाची लोकमान्य विद्यालयात सोय करण्यात आली. लोकमान्य शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांची आपल्या मित्रांबरोबर तब्बल सात महिन्यांनंतर भेट झाली. कोरोना महामारीमुळे बंद असलेली शाळा पुरामुळे पुन्हा भरली.

पंढरपूरात भरली शाळा

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला पूर आल्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून पूररेषा भागातील कुटुंबाचे शाळेत स्थलांतर करण्यात आले. सात महिने बंद असलेल्या शाळांमध्ये संगीत खुर्ची, सापशिडी, गोष्टी, खेळ, गाण्यांच्या धमालीचा विद्यार्थांनी आनंद घेतला.

विद्यार्थ्यांना गोळा करणे, शाळेत तासाला बसवणे, हे काम शाळा करते. मात्र कोरोना आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे ही आनोखी शाळा दिसून आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.