पंढरपूर (सोलापूर) - संत ज्ञानेश्वर पालखी राष्ट्रीय महामार्गाचे मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम गतीने सुरू आहे. महामार्गालगत येणारी सर्व झाडे, घरे आणि अडसर ठरणाऱ्या गोष्टी बाजूला करण्यात आल्या आहेत. बाजीराव विहिरीचाही काही भाग महामार्गात बाधित झाला आहे. या पेशवेकालीन आणि ऐतिहासिक असलेल्या या विहिरीचे जतन व्हावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाकडून केली आहे. त्यानंतर बाजीराव विहिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुरातत्व विभागाकडून पत्र-
बाजीराव विहीर जवळपास २०० वर्ष जुनी आहे. ती नियमानुसार प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडते. ती नष्ट करु नये, तसेच बाजीराव विहीरीच्या पायऱ्या विहीरीतल उत्तम बांधकामाचा नमुना आहे. विहीर जवळपास २०० वर्ष जुनी आहे. ती नियमानुसार प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडते. ही विहीर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदिकरणाच्या कामात नष्ट करण्यात येऊ नये. याबाबत संबंधितास उचित आदेश करुन प्राचीन वारसा जपण्यास सहकार्य करावे, असे पत्र सोलापूर जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकृत अधिकाऱ्यांना पुरातत्व विभागाकडून देण्यात आले आहे.
विठ्ठलाच्या सेवेसाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेली ऐतिहासिक विहीर-
मध्ययुगीन काळातील जुनी बाजीराव विहीर ही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदिकरणाच्या कामात नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. ही विहीर पंढरपूर येथील ऐतिहासिक ठेवा असलेल्या विहीरपैंकी एक आहे. आषाढी किंवा कार्तिकीची वारीमध्ये वारकरी पंढरपूरला येतांना बाजीराव विहिरीजवळ मुक्काम करतात. पंढरपूर यथील श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पुजेसाठी तुळशी फुलांचा बाग वाखर येथे केला होता. व त्याच जमिनीत विठ्ठलाच्या सेवेसाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेली ऐतिहासिक विहीर आहे. या विहीरीवरुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग विहीरीस वळसा घालून पेढे न्यावा, अशी विनंती इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ञ राज मेमाणे यांनी केली आहे.
विहिरीचे जतन करण्याच्या दृष्टीनेच प्रशासनाचे प्रयत्न सुरू-
बाजीराव विहिरीजवळ उड्डाणपूल होणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड आहे. दक्षिण बाजूच्या सर्व्हिस रोडमध्ये विहिरीचा काही भाग बाधित होणार आहे. तरीही शंभर टक्के विहीर सुरक्षित राहावी, यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्यांचे अधिकारी येणार आहेत. विहिरीचे जतन कशा पद्धतीने होईल, या दृष्टीनेच प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
हेही वाचा- आरक्षणावरील स्थगितीने मराठा समाजात असंतोष; राज्य सरकारच्या भूमिकेवर अनेकांची टीका
हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी