ETV Bharat / state

एकदा संधी द्या, प्रश्न सोडवायला कमी पडलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही - संजयमामा शिंदे

author img

By

Published : Oct 20, 2019, 3:23 PM IST

पाण्यापासून वंचित असणाऱ्या ३६ गावांचा पाणी प्रश्न मीच सोडवणार असल्याचे वक्तव्य करमाळा विधानसभेचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी केले. sanjaymama shinde speech in karmala, sanjaymama speech in barleoni, vidhansabha election 2019, state assembly election maharashtra 2019, विधानसभा निवडणूक, करमाळा विधानसभा, संजयमामा शिंदेचा प्रचार

संजयमामा शिंदे

सोलापूर - पाण्यापासून वंचित असणाऱ्या ३६ गावांचा पाणी प्रश्न मीच सोडवणार असल्याचे वक्तव्य करमाळा विधानसभेचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी केले. आजपर्यंत तुम्ही इतरांना संधी दिली आहे. एक वेळ मला संधी देऊन पाहा. जर तुमचे प्रश्न सोडावायला कमी पडलो तर पुढच्या वेळेस मतांचा जोगवा मागायला येणार नाही असेही शिंदे म्हणाले.

संजयमामा शिंदे

बारलोणी येथे संजयमामा शिंदे यांच्या प्रचाराचा समारोप झाला. त्यावेळी आयोजीत सभेत संजयमामा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयवंतराव जगतापही होते.

शब्द पाळला नाही तर संजय शिंदे हे नाव लावणार नाही

विरोधक काहीही टीका करत असले तरी एक लक्षात ठेवा. या ३६ गावांचा प्रश्न मीच सोडवणार आहे. दिलेला शब्द पाळायला कमी पडलो तर संजय शिंदे हे नाव लावणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

karmala
संजयमामांच्या सभेत संबोधीत करताना जयवंतराव जगताप

हेही वाचा - नव्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं, असं जीवन अन् राजकारणही नको; धनंजय मुंडे भावुक

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

पुर्वजांच्या पुण्याईवर मतदान मागणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा - जगताप
माढा-करमाळा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मी संजय शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणी जातीवर तर कोणी पूर्वजांच्या पुण्याईवर मतदान मागत आहे. त्यांना घरचा रस्ता दाखवा व मामांना विकासासाठी साथ द्या, असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.

karmala
संजयमामांच्या सभेला जमलेली गर्दी

सालसे ते यावली या करमाळा-माढा-मोहोळ या तीन तालुक्यातील रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. आज त्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे एकनाथ महाराज पालखी मार्ग, सबस्टेशन, बेंद ओढ्यात उजनीचे पाणी सोडणे, कुर्डूवाडी रेल्वेच्या वर्कशॉपसाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. मामा जि.प.अध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासालाच गती मिळाल्याचे वक्तव्य माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी केले. मामांना करमाळा-माढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या, ते संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत असेही बबनदादा शिंदे म्हणाले.

Intro:Body:करमाळा प्रतिनिधी - शितलकुमार मोटे

Slug - करमाळा - ३६ गावांचे प्रश्न मीच सोडविणार- संजय शिंदे
बारलोणी येथे प्रचाराचा समारोप.

Anchor - कुर्डू, पिंपळखुटे, अंबाड, भोगेवाडी या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांसह ३६ गावांचे प्रश्न मीच सोडविणार आसल्याचे ठाम प्रतिपादन संजय शिंदे यांनी केले.
बारलोणी येथे प्रचाराचा समारोप सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आजपर्यंत तुंम्ही इतरांना संधी दिली आहे. एक वेळ मला संधी देऊन पहा. जर तुमचे प्रश्न सोडावायला कमी पडलो तर पुढच्या वेळेस मतांचा जोगवा मागायला मी येणार नाही. विरोधक काहीही टीका करत असले तरी एक लक्षात ठेवा. या ३६ गावांचे प्रश्न मीच सोडविणार आहे. दिलेला शब्द पाळायला कमी पडलो तर संजय शिंदे हे नाव लावणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला .

Vo - यावेळी दत्ता गवळी, आण्णा ढाणे, आप्पा उबाळे, संजय पाटील घाटणेकर, व्यंकटेश पाटील, हर्षल बागल आदींची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर वामन उबाळे, भरत पाटील, युसुफ दाळवाले, व्यंकटेश पाटील, जेष्ठ नेते बी.डी पाटील, पुंडलिक साळवे, भरत पाटील, भारत गाडे, राजाराम ढगे, हर्षल बागल, आप्पासाहेब उबाळे, संपतलाल संचेती, विलास उबाळे, पवन पाटील, ज्ञानदेव चोपडे, भारत पाटील, मच्छिंद्र बोराटे, सुखदेव भानवसे, सौदागर झुंडरे, प्रशांत पाटील, संदीप पाटील, भारत शेळके, प्रकाश उपासे, राजाभाऊ पाटील, पप्पू संचेती, सर्जेराव जगताप, मुन्ना अनंतकवळस, नितीन गोरे, कुमार भोसले, बापू भोसले, वसंत आप्पा जगताप, संतोष कापरे, अभिजीत संचेती, लक्ष्मण खर्चे, रामलिंग गाडे, रामहरी हांडे, विजय ठेंगल, कुलदीप ठेंगल, शहाजी ढाणे, बापू जगताप, जीवन पाटील, दत्ता उपासे आदी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करमाळा- माढा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मी संजय शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणी जातीवर तर कोणी पूर्वजांच्या पुण्याईवर मतदान मागत आहे. त्यांना घरचा रस्ता दाखवा व मामांना विकासासाठी साथ द्या .- माजी आमदार जयवंतराव जगताप

सालसे ते यावली या करमाळा-माढा-मोहोळ या तीन तालुक्यातील रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला. आज त्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे एकनाथ महाराज पालखी मार्ग, सबस्टेशन, बेंद ओढ्यात उजनीचे पाणी सोडणे, कुर्डूवाडी रेल्वेच्या वर्कशाॕपसाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. मामा जि.प.अध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासालाच गती प्राप्त झाली आहे. मामांना करमाळा-माढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. ते संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत. - आमदार बबन शिंदेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.