ETV Bharat / state

माझे आणि जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज - संजय शिंदे

माझं आणि जयवंत जगताप यांचे लव्ह मॅरेज आहे. कारण लव्ह मॅरेज असले की देण्याघेण्याचा प्रश्न येत नसल्याचे वक्तव्य करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी केले.

जयवंतराव जगताप आणि संजयमामा शिंदे
author img

By

Published : Oct 10, 2019, 1:02 PM IST

सोलापूर - माझं आणि जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज आहे. कारण लव्ह मॅरेज असले की देण्याघेण्याचा प्रश्न येत नसल्याचे वक्तव्य करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी केले. करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवत असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.

solapur
जयवंतराव जगताप आणि संजयमामा शिंदे

अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ शिंदे गट व जगताप गट यांची सभा करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालय येथे संपन्न झाली. यावेळी संजयमामा शिंदे बोलत होते. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार संघटना, मनसे, शेतकरी संघटना, भिम आर्मी, काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर ही एकत्रित पहिलीच सभा असल्याने तालुक्याचे याकडे लक्ष लागले होते.

solapur
जयवंतराव जगताप आणि संजयमामा शिंदे

हेही वाचा - 'लोकसंख्या किंचित म्हणून अमरावतीतील सोनेरा काकडे गाव विकासापासून वंचित'

हेही वाचा - शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा; ऐन निवडणुकीत शिवसेनेला धक्का

२०१४ ला या भागाची माहिती नसतानाही या भागातल्या जनतेने मोठी मदत केली. त्यानंतर मी करमाळा कर्मभूमी मानून कामास सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावोगावी विकासकामांना प्राधान्य दिल्याचे शिंदे म्हणाले. जिल्हा परिषदेचा निधी काय असतो, हे सर्वांना दाखवून दिले. कामकाज करताना गट-तट न पाहता तालुक्याचा विकास पाहिला. आगामी काळात उद्योग, सिंचन, वीज, शिक्षण व इतर प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य राहिल. यासाठी आपण मला संधी द्यावी. कुडघोडीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

solapur
सभेला जमलेला जनसमुदाय

तालुक्यातील नेतृत्व चुकीच्या हाती गेल्यामुळे तालुका मागे राहिला आहे. मार्केट कमिटीमध्ये वाईट प्रसंग आले होते. त्या काळामध्ये धाकटा भाऊ म्हणून संजय शिंदे यांनी मला मदत केली. मी काही काळ शिंदे यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांच्या कामाची पारदर्शक पद्धत व शेतकऱ्यांविषयी असलेली आत्मीयता पाहिलेली आहे. तसेच चांगल्या माणसाला सहकार्य केले तर तालुक्याचा विकास होईल म्हणूनच मी विचारपूर्वक पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जयवंत जगताप म्हणाले. आम्ही आदिनाथमध्ये पारदर्शक कारभार केला. आजतागायत आदिनाथ कारखान्याचा हिशोब काढा कोणाच्या पगारी थकल्या आहेत, ते समजेल असेही जगताप म्हणाले.

Intro:Body:

Slug - करमाळा - माझे व जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज - संजय शिंदे

Anchor - जयवंतराव जगताप यांचा व आमचा पाठींबा आता नाही झाला तर मार्केट कमिटी निवडणूक प्रसंगीच झाला आहे. त्यामुळे आमचे लव्ह मँरेज आहे अरेंज मँरेज नाही. तसेच मी करमाळा तालुक्याचा विकास घडवण्यासाठी विधानसभा लढवत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी केले. यावेळी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादी कॉग्रेस, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना यांनी पाठिंबा दिला.

बाईट - 1 - संजय शिंदे

Vo - 1 - अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ शिंदे गट व जगताप गटाची सभा करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालय येथे संपन्न झाली. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादी प्रहार, मनसे, शेतकरी संघटना, भिम आर्मी, कॉंग्रेस यांनी पाठिंबा दिला. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर ही एकत्रित पहिलीच सभा असल्याने तालुक्याचे याकडे लक्ष लागले होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, २०१४ ला या भागाची माहिती नसतानाही या भागाने मतरुपी मोठी मदत केली. त्यानंतर मी करमाळा कर्मभूमी मानून कामकाजास सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावोगावी विकासकांना प्राधान्य दिले. जिल्हा परिषदचा निधी काय असतो हे सर्वांना दाखवून दिले. कामकाज करताना गट-तट न पाहता तालुक्याचा विकास पाहिला. आगामी काळात उद्योग, सिंचन, वीज व शिक्षण व इतर प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य राहील. यासाठी आपण मला संधी द्यावी. कुडघोडीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करणार आहे असेही शिंदे म्हणाले.

बाईट - 2 - संजय शिंदे ( अपक्ष उमेदवार )

तालुक्यातील नेतृत्व चुकीच्या हाती गेले त्यामुळे तालुका मागे राहिला. मार्केट कमिटी मध्ये वाईट प्रसंग आले होते त्याकाळामध्ये धाकटा भाऊ म्हणून संजयमामा शिंदे यांनी मला मदत केली. मी काही काळ शिंदे यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांच्या कामाची पारदर्शक पद्धत व शेतकऱ्यांविषयी असलेली आत्मीयता पाहिलेली आहे. तसेच चांगल्या माणसाला सहकार्य केले तर तालुक्याचा विकास होईल म्हणूनच मी विचारपूर्वक पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही आदिनाथ मध्ये पारदर्शक कारभार केला. आजतागायतचे आदिनाथ कारखान्याचा हिशोब काढा कोणाच्या पगारी थकल्या आहेत ते समजेल.

बाईट - 3 - जयवंतराव जगताप ( माजी आमदार )

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.