ETV Bharat / state

संजय शिंदेंचा रत्नाकर गुट्टे करू, चंद्रकांत पाटलांचा धमकीवजा इशारा

संजय शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मदतीने जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळवले. मात्र, निवडणुक जवळ येताच राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. त्यामुळे शिंदे भाजपच्या निशाण्यावर आहेत.

author img

By

Published : Apr 2, 2019, 9:14 AM IST

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांसोबत सुभाष देशमुख

सोलापूर - संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलली आहेत. त्यामुळे रत्नाकर गुट्टेंना जसे तुरुंगात टाकले तसे त्यांनाही टाकू, असा धमकीवजा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. संजय शिंदे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे.

संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला

संजय शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मदतीने जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळवले. मात्र, निवडणुक जवळ येताच राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. त्यामुळे शिंदे भाजपच्या निशाण्यावर आहेत.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर फॅक्टरीचे संचालक रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले होते. त्या प्रकरणी त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले आहे. याच प्रकरणाचा संदर्भ पाटली यांनी दिला. गुट्टेंप्रमाणे शिंदेंना देखील गजाआड पाठवू असे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात माढा मतदारसंघात सुडाचे राजकारण पहायला मिळणार असे दिसत आहे.

Intro:सोलापूर : शेतकऱ्यांच्या नावांवर कर्ज काढणाऱ्या संजय शिंदे यांचा रत्नाकर गुट्टे करु असा सुचक इशारा राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.
ते सोलापूरात पत्रकारांशी बोलत होते.त्यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना हा सज्जड दम दिलाय.

Body:सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील विरोधाचं भांडवल करत सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद माढ्याच्या संजय शिंदे यांनी मिळवलं.पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची उमेदवारी नाकारत राष्ट्रवादीत प्रवेश केला अन माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी ही मिळवली.
मोहिते पाटलांना विरोध म्हणून राष्ट्रवादीचं सर्वाधिक संख्याबळ असताना भाजपच्या मदतीने संजय शिंदे यांनी सोलापूर
जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली, ते अध्यक्ष झाले.दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध जोडले. कामं करून घेतली.मात्र निवडणुकीत दगा दिल्याने भाजप नेत्यांचं पित्त खवळलं आहे.
त्याचाच भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे इशारावजा वक्तव्य केलंय.

Conclusion:परभणी जिल्ह्यात गंगाखेड शुगरच्या रत्नाकर गुट्टे या साखरसाम्राटाने शेतकऱ्यांच्या नावांवर कर्ज उचललं आहे.त्या प्रकरणी गुट्टेनां सरकारनं तुरूंगात घातलंय.तसाच प्रकार राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी केलाय.त्यामुळं गुट्टे प्रकरणाचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील यांनी संजय शिंदे यांना सुचाक इशारा दिलाय.त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघात यापुढं सत्ताधारी आणि वितोधकांतलं सुडाचं राजकारण पाहायला मिळणार आहे. हर मात्र नक्की.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.