ETV Bharat / state

माढ्यातील संजय शिंदे विरोधक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भाजपला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर माढा तालुक्यातील संजय शिंदेच्या विरोधकांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे.

author img

By

Published : Mar 28, 2019, 9:53 AM IST

माढ्यातील संजय शिंदे विरोधक मुख्यमंत्र्याच्या भेटीला

सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर माढा तालुक्यातील संजय शिंदेच्या विरोधकांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी माढ्यात भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासह माढ्यातील शिंदे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना माढ्यातून लढण्यास नकार दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली. या सगळ्या गोष्टीमुळे राज्याचे मुख्यमंत्री नाराज झाले असून मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. माढा तालुक्यातील संजय शिंदे यांच्या विरोधकांना वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांच्या मागण्या मान्य करत भाजपच्या उमेदवारासाठी काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपावरुन माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे हे शिंदे यांच्या विरोधकांना एकत्र घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

माढा विधानसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न आणि समस्यांच्या जवळपास ३०० कोटींच्या कामांच्या पुर्ततेसाठी मुख्यमंत्र्यानी ठोस आश्वासन व विश्वास दिला आहे. त्यामुळे माढा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे विरोधकांनी सांगितले आहे.

शिवाजी कांबळे हे ४ वेळा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडूण आले आहेत. तर २ वेळा त्यांना समाजकल्याण सभापती हे पद राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र, मागील जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजी कांबळे यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या कांबळेंनी जिल्हा परिषदेची अपक्ष निवडणूक लढविली आणि ते पराभूत झाले. तेव्हापासून शिवाजी कांबळे हे राष्ट्रवादी आणि शिंदे कुटुंबियांपासून दूर गेले. शिंदे यांच्या विरोधकांना एकत्र करून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून केला जात आहे.

शिवाजी कांबळे, संजय पाटील, भिमा नगरकर, राजेंद्र चवरे, व्यंकटेश पाटील, शिवाजी सुर्वे, सुधीर महाडिक, पोपट अनपट, माणिक लांडे(परिते), सचिन ढवळे, सज्जन ढवळे, किरण सोलंकर, धनाजी क्षीरसागर, नितीन मस्के यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

Intro:R_MH_SOL_04_27_SHIVAJI_KAMBALE_MEET_CM_MADHA_S_PAWAR
माढ्यातील संजय शिंदे विरोधक मुख्यमंत्र्याच्या भेटीला
शिंदे विरोधकांचा माढ्यात भाजपाला पाठिंबा
सोलापूर-
राष्ट्रवादी कॉंग्रेसने माढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर माढा तालूक्यातील संजय शिंदे यांचे विरोधक असलेल्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून माढ्यात भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासह माढ्यातील शिंदे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Body:सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना माढ्यातून लढण्यास नकार दिला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी स्विकारली. या सगळ्या गोष्टीमुळे राज्याचे मुख्यमंत्री प्रचंड नाराज झाले असून मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी पावले उचलायला सुरूवात केली आहे. माढा तालूक्यातील संजय शिंदे यांच्या विरोधकांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेऊन संजय शिंदे यांच्या विरोधकांच्या असलेल्या मागण्या मान्य करत भाजपच्या उमेदवारासाठी काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या निरोपावरुन माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे हे माढ्यातील संजय शिंदे यांच्या सर्व विरोधकांना एकत्र घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

माढ्यातील शिवाजी कांबळे हे 4 वेळा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडूण आलेले आहेत. दोन वेळा शिवाजी कांबळे यांना समाजकल्याण सभापती पद हे राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिले होते. मात्र मागील जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवाजी कांबळे यांना उमेदवारी नाकारली त्यामुळे नाराज झालेल्या शिवाजी कांबळे यांनी अपक्ष जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली आणि ते पराभूत झाले. तेव्हा पासून शिवाजी कांबळे हे राष्ट्रवादी आणि शिंदे कुटूंबियापासून दूर गेले. शिंदे यांच्या विरोधकांना एकत्र करून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून माढ्यातील शिंदे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माढ्यात भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे स्पष्ट केले आहे.

माढा विधानसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांच्या -समस्यांच्या जवळपास 300 कोटींच्या कामांच्या पुर्ततेसाठी मुख्यमंत्र्यानी ठोस शब्द- आश्वासन व विश्वास दिल्यानेच भाजपाला माढा लोकसभेच्या निवडणुकीकरीता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा यावेळी शिंदे विरोधकांनी सांगितले आहे.
शिवाजी कांबळे,संजय पाटील भिमानगरकर,राजेंद्र चवरे,व्यंकटेश पाटील, शिवाजी सुर्वे,सुधीर महाडिक,पोपट अनपट, माणिक लांडे(परिते),सचिन ढवळे,सज्जन ढवळे,किरण सोलंकर, धनाजी क्षीरसागर,नितीन मस्के यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. Conclusion:नोट- सोबत फोटो जोडले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.