ETV Bharat / state

माढ्यातून संजय शिंदे, तर उस्मानबादमधून राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी - उमेदवारी

माढ्यातून संजय शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी
author img

By

Published : Mar 22, 2019, 5:56 PM IST

Updated : Mar 22, 2019, 9:08 PM IST

2019-03-22 17:52:28

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याची सर्वांना उत्सुकता लागली होती.

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उस्मानबादमधून राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिली होती उमेदवारी. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांच्या मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी आग्रह होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने या नावाला विरोध केल्याने रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याची उत्सुकता लागून राहिली होती.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे घेतले. त्यानंतर त्यांना माढा लोकसभा मतदार संघातून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. शुक्रवारी बारामतीतल्या आप्पासाहेब पवार सभागृहात संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संजय शिंदे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून आलेले संजय शिंदे यांनी भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवले होते. संजय शिंदे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेकडून करमाळा मतदारसंघात विधानसभा लढवली होती. त्यानंतर आता संजय शिंदे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या स्वगृही परतले आहेत.

Intro:Body:

माढ्यातून संजय शिंदे, तर उस्मानबादमधून राणा जगतसिंह पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी 

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उस्मानबादमधून राणा जगतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांना दिली होती उमेदवारी. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांच्या मुलगा रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी आग्रह होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने या नावाला विरोध केल्याने रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली होती.

 रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातले मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे घेतले आणि लोकसभा मतदार संघातून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली, शुक्रवारी बारामतीतल्या अप्पासाहेब पवार सभागृहात संजय शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांचा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संजय शिंदे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून आलेले संजय शिंदे यांनी भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवलं होतं संजय शिंदे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच कार्यकर्ते मात्र 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून विधानसभा लढवली होती करमाळा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांनी विधानसभा लढवली होती आणि आता संजय शिंदे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या स्वगृही परतले आहे म्हाडा लोकसभा मतदार संघासाठी त्यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा चेहरा समोर आणला आहे संजय शिंदे हे सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात त्यांचे बंधू बबन शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत......

Conclusion:
Last Updated : Mar 22, 2019, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.