सोलापूर - बार्शी येथे पोलीस विभाग, निर्भया महिला सुरक्षा पथक आणि लायन्स क्लब बार्शी यांच्यावतीने शहरात राष्ट्रीय एकात्मता आणि आरोग्यासाठी 'रन फॉर युनिटी' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी सकाळी या उपक्रमा अंतर्गत शहरातील विविध वयोगटातील नागरिक धावले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - सारंगखेडा 'चेतक महोत्सवा'तील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब
शहरातील शिवाजी महाविद्यालयापासून सोमवार पेठमार्गे ही दौड पुन्हा शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी संपली. या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन बार्शीचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले होते.