ETV Bharat / state

पशुधनाने दिला दुष्काळाशी दोन हात करण्याचा आधार - रुक्मिणीताई खताळ

पशुधन वाचावे, म्हणून ऐन दुष्काळात स्वतःच्या शेतातील 17 एकर ऊस दुसऱ्यांच्या जनावरांना मोफत देण्याची दानत मोहोळच्या एका महिला शेतकऱ्याने दाखवली आहे.

पशुधनाने दिला दुष्काळाशी दोन हात करण्याचा आधार
author img

By

Published : Jun 22, 2019, 9:03 PM IST

Updated : Jun 22, 2019, 10:23 PM IST

सोलापूर - पशुधन वाचावे, म्हणून ऐन दुष्काळात स्वतःच्या शेतातील 17 एकर ऊस दुसऱ्यांच्या जनावरांना मोफत देण्याची दानत मोहोळच्या एका महिला शेतकऱ्याने दाखवली आहे. रुक्मिणीताई खताळ (लांबोटी) असे त्यांच नाव आहे. यांनी पशुप्रेमाच्या भावनेतून आपल्या 17 एकर शिवारातील ऊस जनावरांसाठी दान केला आहे. तर रुक्मिणीताई यांच्याकडेही 100 च्या आसपास जनावरे असून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी या जनावरांनीच आधार दिल्याचे रुक्मिणीताई सांगतात.

पशुधनाने दिला दुष्काळाशी दोन हात करण्याचा आधार

रुक्मिणीताई खताळ यांनी त्यांच्याकडे काहीही नसताना 3 दगडांवर चुल मांडून लांबोटी चिवडा आणि चहाचा व्यवसाय सुरू केला होता. आता हा व्यवसाय नावारूपाला आला आहे. त्यांचा हा हॉटेल व्यवसाय असला तरी पशुधन हीच त्यांची संपत्ती असल्याचे रुक्मिणीताई सांगतात. त्यांच्याकडे सध्या शंभराच्या आसपास लहान-मोठी जनावरे आहेत. यंदा दुष्काळ पड्ल्यामुळे जनावरे संभाळायची कशी? हा रुक्मिणीताईसमोर प्रश्न पडला होता. मात्र, जनावरे कत्तलखान्यात जाऊ नये, अशी त्यांच्या पतीची शिकवण होती. ती रुक्मिणीताईंनीही आयुष्यभर जपलीय. त्या एखादे जनावर गावातील लोकांना मोफत देतात. मात्र, कत्तलखान्यात देत नाहीत.

जनावरांची देखभाल करण्यातच रुक्मिणीताईंचा दिवस जातो. त्या जनावरांवर आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे प्रेम करतात. विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आजही पशुधनाच्या जोरावर तग धरून आहे.

Intro:(टीप - एक दिवस महिला बळीराजासोबत ही स्टोरी स्पेशल आहे.)

सोलापूर : पशुधन वाचावं म्हणून ऐन दुष्काळात स्वतःच्या शेतातला सतरा एकर ऊस दुसऱ्याच्या जनावरांना मोफत वाटण्याची दानत एका महिला शेतकऱ्यांनं दाखवलीय.मोहोळ तालुक्यातल्या लांबोटीच्या रुक्मिणीताई खताळ यांनी आपल्या पशुप्रेमाच्या जाणिवेनं हे फक्त शेतकरीचं करु शकतो हे पुन्हा एकदा समाजाला दाखवून दिलंय.
Body:तीन दगडांवर चुल करून सुरु केलेला लांबोटी चिवडा आणि चहाचा व्यवसाय आता नावारूपाला आलाय.हॉटेल हा व्यवसाय असला तर पशुधन ही त्यांची संपत्ती आहे.त्यांच्याकडं आज शंभराच्या जवळपास लहान-मोठी जनावरं आहेत.पण त्यांची ही संपदा यंदाच्या दुष्काळात आली. पदरमोड करून आपण जनावरं पोसत असून जनावरं कसायाच्या कत्तलखान्यात जाऊ नयेत म्हणून प्रयत्न चालवले आहेत.तशी त्यांच्या पतीची शिकवण होती.तीच त्यांनी आयुष्यभर जपलीय.

दिवसातून चारवेळा जनावरांची देखभाल पाहण्यात रुक्मिणीताईचा कधी खंड पडत नाही.कारण त्या स्वतः जनावरांवर मनापासून प्रेम करतात.एवढंचं काय कष्ट हेच भांडवलं आहे रुक्मिणीताई यांनी आयुष्यात कामावलंय. म्हणूनचं टंचाईचा सामना करत दुष्काळाशी दोन हात करण्यात आपण मागं नसल्याचंच रुक्मिणीताई या समाजाला ठणकावून सांगतात.
Conclusion:विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत आजही पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी तग धरून आहे.तो पशुधनाच्या जोरावर.म्हणून याभागातला शेतकरी
आत्महत्येसारख्या दुबळ्या मानसिकतेचा मार्ग निवडताना दिसत नाही. म्हणून तीन दगडांच्या चुलीवर हॉटेल व्यवसाय थाटणाऱ्या, तितक्याचं निष्ठेनं गायी-म्हशींना पोसणा-या रुक्मिणीताई सोलापूरकरांच्या आयकॉन आहेत.

Last Updated : Jun 22, 2019, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.