ETV Bharat / state

सर्व जागा जिंकत 'आरपीआय'ची बॅगेहळ्ळीत विरोधकांना धोबीपछाड - ग्राम पंचायत अक्कलकोट बातमी

अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत आरपीआय (आठवले गट)ने सर्वच्या सर्व जागेवर विजय मिळवत गुलाल उधळला आहे.

रामदास आठवले
रामदास आठवले
author img

By

Published : Jan 18, 2021, 8:24 PM IST

Updated : Jan 18, 2021, 8:50 PM IST

सोलापूर - अचूक नियोजन आणि दूरदृष्टीच्या नियोजनाने अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरपीआय (आठवले गट)ने सर्व पक्षांना धोबीपछाड करून एक हाती सत्ता मिळवली आहे. विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सातही जागांवर आरपीआयने गुलाल उधळला.

अचूक नियोजनाने आरपीआयचे सर्व उमेदवार विजयी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचे पॅनल उतरवले होते. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. गायकवाड यांनी या निवडणुकीचे अचूक नियोजन केले होते. घरोघरी जाऊन प्रचार करतानाच येथील मतदारांच्या समस्याही जाणून घेण्याचे काम गायकवाड यांनी केले होते. त्यामुळे रिपाइंच्या पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे. यावेळी आरपीआयने स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का दिला.

जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष ब्यागेहळ्ळीकडे होते

सोलापूर जिल्ह्यात एकूण 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरीत 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. सोलापुरातील उरलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आठवले गट बॅगेहळ्ळीत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले होते.

हेही वाचा - सोलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू

Last Updated : Jan 18, 2021, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.