पंढरपूर (सोलापूर)- पुणे-सोलापूर महामार्गावरील अंजनगाव येथे दोघा जणांनी चालत्या ट्रकमध्ये कोयत्याचा धाक दाखवून एक लाख १९ हजार रुपयांची चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
ट्रकमधून उतरताना दोघा आरोपींची ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दत्तू परबत व चालक हैदर आमिन पठाण (रा. अंजनगाव उमाटे, ता. माढा) हे दोघे तांडूर येथून ट्रक (एम.एच १२ ७१७४) मधून सिमेंटच्या गोणी भरून पुण्याच्या दिशेने जात होते. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माढा तालुक्यातील मोडनिंब येथील उड्डाणपुलावर ९ जणांच्या अज्ञात टोळीने ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक पठाण यांच्या प्रसंगवधन ओळखून त्यांनी ट्रक न थांबता तसाच तो पुढे नेला. मात्र, टोळीतील नऊ जणांनी मोटरसायकलवर ट्रकचा पाठलाग केला. तसेच ट्रकच्या काचेवर दगडफेक करत ट्रक थांबवण्यास भाग पाडले. त्यातील दोन दरोडेखोरांनी जणांनी चालत्या ट्रकमध्ये चढत, ट्रकच्या केबिनमध्ये असणाऱ्या मालकाच्या गळ्याला कोयता लावत जवळील एक लाख १९ हजार रुपयांचा रक्कम लूटले. दरोडेखोर ट्रकमधून खाली उतरताना त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क निघाल्यामुळे त्या दोघांचा चेहरा ट्रकचालकाच्या निदर्शनास आला.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मालक रवींद्र दत्तू परबत व चालक हैदर आमिन पठाण यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी नऊ अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ओळखपरेडमध्ये दोघांची ओळख
टेंभुर्णी पोलिसांकडून पोलीस ठाण्यात क्षेत्रातील वाटमारी करणारे संशयित व्यक्तींना ओळख परेडसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. यामधील टोळीतील काही संशय पोलिसांनी ओळख परेड घेतली. ट्रक मालकांनी टोळीतील नऊपैकी दोन आरोपींना ओळखले. सागर मसुरकर व सौरभ माळी (रा. अंजनगाव ता. माढा) यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित सात जणांचा पोलीस शोध घेत आहेत.