ETV Bharat / state

कोरोनाच्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात बाल कोविड रुग्णालयांची उभारणी - सोलापूर कोरोना न्यूज अपडेट

राज्यात कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता आहे, या लाटेचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात तयारी सुरू करण्यात आली असून, बाल कोविड रुग्णालय उभारण्याच्या अनुषंगाने आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आढावा घेतला.

कोरोनाच्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आढावा

author img

By

Published : May 12, 2021, 10:38 PM IST

सोलापूर- राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झालते, दरम्यान आता तिसऱ्या लाटेची देखील शक्यत वर्तवण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी युद्धपातळीवर कोविड रुग्णालये कसे उभारता येतील, याचा आढावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी घेतला आहे.

सोलापूर विजापूर महामार्गावर असलेल्या चौधरी बाल रुग्णालयात सध्या सर्वसाधारण कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या बाल रुग्णालयात बालकांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. 50 पेक्षा अधिक बालकांवर एकाच वेळी उपचार करण्याची क्षमता या रुग्णालयात असून, सुरुवातीला या रुग्णालयात बालकांसाठी 20 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, डॉ. रोहन वायचळ, डॉ. सचिन पवार यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील चौधरी बाल रुग्णालयाची पाहणी केली.

कोरोनाच्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आढावा

जिल्ह्यात सध्या तीन बाल कोविड रुग्णालये

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन ठिकाणी बाल कोविड रुग्णालये उभारण्यात आले असून, ज्या बालकांना कोविडची लक्षणे दिसत आहेत, त्यांना या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे. यामध्ये पंढरपूर येथील डॉ. शहा बाल कोविड रुग्णालय आणि डॉ. देवकते यांचे बाल कोविड रुग्णालय अशा दोन कोविड रुग्णालयाचा तर अकलूज मधील एका बाल कोविड रुग्णालयाचा समावेश आहे. भविष्यात बार्शी, माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर आदी तालुक्यात बाल कोविड रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती डॉ प्रदीप ढेले यांनी यावेळी दिली. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 बाल कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Mucormycosis : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा कहर, राज्यभर सापडत आहेत रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.