पंढरपूर - विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूरला ओळखले जाते. प्रतिपंढरपूर म्हणूनरुक्मिणीचे माहेर कौडण्यापूर आहे अस म्हटले जाते. आषाढी एकादशीला दरवर्षी रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजे, पंढरपूरला जातात. (१५९४) वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. मात्र, यावर्षीही कोरोनाच्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द झाली. परंतु, पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यामध्ये १० पालख्यांतील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यापूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी होती.
पालखी 1800 किलोमीटरचा प्रवास करून माहेरी परतली
ही रुक्मिणीची पालखी आता आपल्या माहेरी कौडण्यापूरला 1800 किलोमीटरचा प्रवास करून परतली आहे. कौडण्यापुर येथे या पालखीचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्याची आतषबाजीही करण्यातही आली. या पालखीची सर्व जबाबदारी तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांच्यावर होती. महाराष्ट्रातील सर्वात लांब पालखी कौंडण्यपूरची असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा मानाच्या पालख्या या शिवशाही बसणे पंढरपूरला दाखल झाल्या होत्या. यामध्ये देहू, आळंदीसह इतर भागातीलही पालख्या होत्या. परंतु, सर्वाधिक लांब पल्ल्याची पालखी ही कौंडण्यपूर येथील होती.