ETV Bharat / state

Showering Flowers On Retired Judge: सोलापूर जिल्हा न्यायाधीशांची सेवानिवृत्ती; फुलांचा वर्षाव करत दिला निरोप - सेवानिवृत्त न्यायाधीशांवर पुष्पवृष्टी

सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र (Solapur District and Sessions Judge) न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी हे (Showering Flowers On Retired Judge) आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायिक सेवेतून निवृत्त झाले. सोलापूर जिल्हा न्यायालयात सेवानिवृत्त न्यायाधीशांना फुलांचा वर्षाव करत अश्रु नयनांनी निरोप दिला. (Dr Shabbir Ahmed)

Showering Flowers On Retired Judge
न्यायाधीशांना निरोप
author img

By

Published : Jul 6, 2023, 8:35 PM IST

निवृत्त न्यायाधिशांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निरोप देताना कर्मचारी वर्ग

सोलापूर: जन्मतः दिव्यांग असूनही अधिक कार्यक्षमता, गुणवत्ता आणि संवेदनशीलता जपत न्यायदानाचे कार्य केलेले न्या. डॉ. औटी यांच्यावर पुष्पवृष्टी करत निरोप देताना संपूर्ण न्यायालयातील सहकारी न्यायाधीश व वकिलांसह अधिकारी आणि (Dr Shabbir Ahmed) कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. (Showering Flowers On Retired Judge) सहकाऱ्यांकडून प्रेमाचा निरोप स्वीकारताना न्या. डॉ. शब्बीर अहमद औटी यांच्याही डोळ्यातूनही अश्रूधारा बरसल्या. (Solapur District and Sessions Judge)

करिअरचा प्रारंभ आणि शेवट सोलापूरातच : न्या. डॉ. औटीनी सोलापुरातून करिअरचा प्रवास सुरू केला. न्यायदानाचा प्रवासही सोलापुरातच संपला. त्यांची ३२ वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातूनच न्यायाधीश म्हणून सेवा सुरू झाली होती. 32 वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास पुन्हा सोलापूर जिल्ह्यातच संपला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त होताना संपूर्ण न्यायालयात कार्यरत असलेले सहयोगी न्यायाधीश, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवाकाळातील शेवटच्या दिवसाचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले.

न्यायाधीशांना आले गहिवरून : कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारापासून दुतर्फा उभे राहून ओंजळीत गुलाबाच्या पाकळ्या आणि फुलांची डॉ. औटी यांच्यावर मुक्त उधळण केली. या प्रेमाने डॉ. औटी अक्षरशः भारावून गेले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ज्या न्यायिक अधिकाराच्या खुर्चीने आपणास पत, प्रतिष्ठा सर्व काही दिले, त्या पवित्र न्यायालयाला अखेरचा प्रणाम करताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता.

औटींचा कार्यकाळ ऐतिहासिक ठरला : सेवानिवृत्त न्यायमूर्ती डॉ. शब्बीर अहमद औटी यांची न्यायदान कार्यक्षेत्रातील कारकीर्द उत्तुंग ठरली. न्यायालयातील अनेक प्रलंबित खटले निकाली काढताना प्रशासकीय कामकाजाचा आवाका उल्लेखनीय ठरला. सोलापूर जिल्हा न्यायालयात अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात पार पडले. सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीला प्रशासकीय मान्यता, माढा आणि करमाळा येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा शुभारंभ, न्यायालय परिसरात संविधानाच्या आकर्षक उद्देशिकेचे अनावरण, वकील व न्यायिक आधिकाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय आदी कामामुळे डॉ. औटी यांची कारकीर्द जिल्हा न्यायालयात ऐतिहासिक ठरली. त्यांच्या या अनोख्या निरोप समारंभाची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.