सोलापूर - राज्यासह सोलापुरातही कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. सोलापूर शहरात 3 हजार 458 सक्रिय रुग्ण असून ग्रामीण भागातही मोठ्या रुग्णांची मोठी वाढ होत आहे. ऑक्सिजन व रेमडेसिवीरच्या मागणीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजन व रेमडेसिवीरची कमतरता भासत आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोना विषाणू मरत नाही. फक्त शरीरातील कोरोना विषाणूची वाढती संख्या रोखण्यात मदत होते, अशी माहिती सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत नागरिकांत गैरसमज
सोलापुरात रेमडेसिवीरबाबत अनेक गैरसमज असल्याचे मत यापूर्वी डॉ. संजीव ठाकूर व डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी व्यक्त केली आहे. कोरोना विराधाती लढाईत रेमडेसिवीर फार मोठे अस्त्र नाही, असे मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. उलट रेमडेसिवीरमुळे किडनी, लिव्हरवर वाईट दुष्परिणाम होतात, अशीही माहिती डॉक्टर व्यक्त करत आहेत.
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळणे महत्वाचे
कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळणे महत्वाचे आहे. सोलापुरात किंवा राज्यात ज्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसाच तुटवडा ऑक्सिजनबाबत निर्माण झाला आहे.
रेमडेसिवीरमुळे कोरोना विषाणू मरत नाही
ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लगेच रेमडेसिवीर इंजेक्शने लागत नाहीत. पहिल्या टप्प्यात व्हिटॅमिन सी किंवा मल्टीव्हिटॅमिन औषध घ्यावे लागते. दुसऱ्या टप्प्यात रुग्णास ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्यास त्याला रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडणार नाही. मात्र, तिसऱ्या टप्प्यात माईल्ड टू मॉडरेट या टप्प्यात जात असताना कोरोना विषाणूची संख्या वाढत असते, अशा वेळीही विषाणूची संख्या नियंत्रण करण्यासाठी रेमडेसिवीर दिले जाते. रेमडेसिवीरचा डोस दिल्याने विषाणू मरत नाही तर फक्त विषाणू संख्या नियंत्रण केली जाते. याबाबत अधिकृत माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा - पंढरपुरात पोलिसांसाठी अवघ्या 38 तासांत कोविड हॉस्पिटलची उभारणी
हेही वाचा - रेमडेसिवीरसाठी महिला रडत पोहोचली नियोजन भवनात; इंजेक्शन वाटपाचा भोंगळ कारभार