ETV Bharat / state

पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन दोन गटात दगडफेक; हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने हाणामारी

हातउसने दिलेल्या पन्नास हजार रुपयांवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दगडफेकही करण्यात आली. आरोपींनी लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने मारहाण करुन दगडफेक केल्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली. दगडफेक आणि हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांना पाहताच मारामारी करणाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

solapur
घटनास्थळावर दाखल झालेले पोलीस
author img

By

Published : Jul 2, 2020, 10:15 PM IST

Updated : Jul 3, 2020, 11:00 PM IST

सोलापूर - हातउसने घेतलेल्या पन्नास हजार रुपयांवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दगडफेकही करण्यात आली. ही घटना मुस्लीम पाच्छा पेठ येथे बुधवारी दुपारी घडली. आरोपींनी लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने मारहाण करुन दगडफेक केल्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली. याप्रकरणी पोलिसांनी १७ आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन दोन गटात दगडफेक; हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने हाणामारी

राजा पठाण यांनी बाबा दांडोती उर्फ बाबा पठाण याला 8 महिन्यांपूर्वी 50 हजार रुपये हात उसने दिले होते. या कारणावरुन वादास सुरवात झाली. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राजा पठाण हा 50 हजार रुपये मागण्यासाठी मुस्लीम पाच्छा पेठ येथील बाबा दंडोतीच्या घराजवळ आला. यावेळी त्याने बाबा पठाण याला उसने दिलेल्या पैशांची मागणी करू लागला. यावरुन दोन गटात हाणामारीस सुरवात झाली. दोन्ही गटातील तरुणांनी हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. मारहाण करताना दगडफेकीस सुरुवात केली.

या परिसरात दगडफेक आणि हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांना पाहताच मारामारी करणाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

यामध्ये बाबा दंडोती (रा मुस्लीम पाच्छा पेठ), राजा पठाण, जाविद उर्फ वास्तव सयद, मुदस्सर जहागीरदार, अब्रार भाईजी, मुकीर उर्फ मुकीया, इम्रान पठाण उर्फ गोऱ्या, समीर अकलाख शेख, शाहिद, युसूफ चौधरी, सद्दाम उर्फ गोऱ्या, इलाही पठाण, तन्वीर पठाण, अलिम अकलाख शेख, तौफिक शेख, साहिल गनी शेख, व रॉय (सर्व रा खड्डा, पाथरुट चौक) आदी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हाणामारी व दगडफेक पाहून परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे ही मारामारी ताबडतोब थांबली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लिंगाडे हे करत आहेत.

Last Updated : Jul 3, 2020, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.