सोलापूर - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णपणे असमानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. या विरोधात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुरुवारी (दि. 22 ऑक्टोबर) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करण्यात आले.
शेतकऱ्यांची सर्व शेती माल व पिके अतिवृष्टीत उद्ध्वस्त झाले आहे. गेल्या वर्षीचा परतीचा पाऊस त्यानंतर कोरोना महामारी आणि नुकतीच झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्व पिके व शेतीमालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (गुरुवार) दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
- या आहेत प्रमुख मागण्या
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे.
- जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार व बागायती शेतजमीनिला प्रति हेक्टर 1 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
- शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीजबिल माफ करावे.
- पुरात शेतजमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मिळावे.
हेही वाचा - देशाच्या विकासामध्ये पोलिसांचे योगदान मोठे - पी. शिवशंकर
हेही वाचा - सोलापूरात कचरा घोटाळा; मनपा अधिकाऱ्यांची तक्रार दाखल