ETV Bharat / state

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राजू शेट्टी यांचे विठ्ठलाला साकडे - Raju Shetty Farmer Problems Pandharpur

आज तिसऱ्यांदा विठ्ठलाला साकडे घातले असून सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विठ्ठलाला केली आहे. सरकारला जर का सुबुद्धी झाली नाही तर, शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

solapur
विठ्ठलाचे दर्शन घेताना राजू शेट्टी
author img

By

Published : Jan 25, 2020, 10:35 AM IST

सोलापूर- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाला तिसर्‍यांदा साकडे घातले. तरी देखील विठ्ठल आपल्याला आशीर्वाद देणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया देताना स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी

महाविकास आघाडीने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, असे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळावे व त्यांना सुबुद्धी मिळावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कार्यकर्त्यांसह विठ्ठलाचे दर्शन घेतले व साकडे घातले. यावेळी शेतकरी पूर्ण कर्जमुक्त व्हावा, असे सांगत मागील दोन वेळा विठ्ठलाला साकडे घातले असून तत्कालीन सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या होत्या, अशी आठवण राजू शेट्टी यांनी याप्रसंगी करून दिली. त्याचबरोबर, आज तिसऱ्यांदा विठ्ठलाला साकडे घातले असून सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विठ्ठलाला केली आहे. सरकारला जर का सुबुद्धी झाली नाही तर, शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

हेही वाचा- सोलापूर महानगरपालिकेच्या विधान सल्लागाराला ५० हजारांची लाच घेताना अटक

Intro:mh_sol_02_swabhimani_andolan_7201168

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचे विठ्ठलाला साकडे आज तिसर्‍यांदा साकडे घातले असले तरी विठ्ठल आपल्याला आशीर्वाद देणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केले आहे . Body:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज विठ्ठलाला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी साकडे घातले . महाविकास आघाडीने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पाळावे आठवण करण्यासाठी व त्यांना तशी सुबुद्धी देण्यासाठी पंढरपूरमध्ये आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी येऊन सर्व कार्यकर्त्यांसहीत विठ्ठलाचे दर्शन घेतले व साकडे घातले की शेतकरी पूर्ण कर्जमुक्त व्हावा ,मागील दोन वेळा विठ्ठलाला साकडे त्यांनी घातले होते आणि त्यांच्या त्या मागण्या तत्कालीन सरकारने पूर्ण केल्या होत्या याची आठवण राजू शेट्टी यांनी करून दिली म्हणून आज तिसऱ्यांदा विठ्ठलाला साकडे घातले आहे व सरकारला सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना विठ्ठलाला केली आहे. सरकारला जर का सुबुद्धी झाली नाही तर शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बाईट- राजू शेट्टी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.