सोलापूर - अडचणीच्या काळात कुटुंबाच्या गरजेसाठी म्हणून साठवलेले महिलांचे पैसे नोटबंदीच्या एका निर्णयाने संपले, गॅसच्या किमती वाढल्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा या प्रश्नांबाबत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाच्या निमित्ताने त्यांचा हिशोब चुकता करा, असे आवाहन राजस्थानच्या महिला व बालविकास मंत्री ममता भुपेश यांनी येथे केले.
हेही वाचा - जयकुमार गोरेंना साथ द्या, पंकजा मुंडेंचे व्हिडिओद्वारे माण-खटावकरांना आवाहन
सोलापूर शहर-मध्यच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनीही 'एक नारी... सब पे भारी' चा नारा देत महिला मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - विकासासाठी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, खडसेंची खदखद
काँग्रेस सरकारच्या काळात 350 रु. गॅस सिलेडंरची किंमत होती. मात्र, आजच्या भाजप सरकारमध्ये 900 रू. गॅस सिलेंडरची किंमत आहे. कोणी केले हे? कोणाच्या खिशात जात आहे हा पैसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप सरकारला प्रश्न विचारा की गेल्या 5 वर्षांत त्यांनी सामान्य जनतेसाठी काय केले, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
हेही वाचा - 'गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करणारा, विकासकामे काय करणार?'
त्याचबरोबर आमदार प्रणिती शिंदे यांनी युवक, युवती, महिला, कष्टकरी, कामगार वर्गापर्यंत पोहचण्यात आघाडी घेतली आहे. तसेच शक्य तितक्या महिलांना आपण एक महिला म्हणून या निवडणुकीतील 26 पुरुषांशी लढत आहोत, असे सांगत या वर्गाला आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. यावेळी आसाममधील काँग्रेस पक्षाच्या खासदार सुश्मिता देव यादेखील प्रामुख्याने उपस्थित होत्या.