सोलापूर - शहरासह जिल्ह्यात आज (बुधुवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. मागील पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली होती. आता तब्बल 15 दिवसानंतर पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पेरणीला वेग येणार आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल 15 दिवसांनंतर सोलापूर शहर व जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे. जूनच्या मध्यावर पाऊस पडल्यानंतर पंधरा दिवसाच्या उघडीनंतर आज पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे.
सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मात्र, मागील आठ वर्षापासून जिल्ह्यामध्ये खरीप पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे कधीकाळी रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा खरिपासाठी ओळखला जाऊ लागला आहे. तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे पुन्हा एकदा शेतातील खरिपाच्या कामाला वेग मिळणार आहे.