सोलापूर - सरकारच्या निषेधार्थ कुर्डूवाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात आल्याचा निषेध करत हा बंद पाळण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने कुर्डूवाडी बंदची हाक देण्यात आली होती.
राज्याने असे सुडबुध्दीने वागलेले सरकार गेल्या ७० वर्षांत कधी पाहिले नाही. इतिहासात पहिल्यादांच इडीचे कार्यालय बंद करावे लागले. हा सरकारचा पहिला पराभव आहे. येणाऱ्या काळात तरुणाई हे जुलमी सरकार उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी कुर्डूवाडी बंदच्या वेळी केले आहे.
हेही वाचा - ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे
शरद पवार यांच्यावर तथाकथित बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ तसेच अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकाम सुरू होण्याआधीच केलेला ८० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, वाढलेली बेरोजगारी, आर्थिक मंदी, अशा अनेक कारणांचा जाब विचारण्यासाठी लोकांनी पुढे येत कुर्डूवाडी बंदची हाक दिली. या बंदला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासुन सर्व दुकाने, बाजारपेठ, शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.
हेही वाचा - पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?
शरद पवार यांची विजयी घौडदोड रोखण्यासाठी भाजप दबावतंत्र वापरत आहे. पण एक दिवस हेच भाजपवाले मुंबई देखील गुजरातला घेऊन जातील, तेव्हा काश्मीरच्या नावाने घोषणा देऊन ३७० ची भाजी करून देशभक्ती दाखवावी लागेल, असा उपरोधिक टोला संभाजी ब्रिगेडचे हर्षल बागल यांनी सरकारला लावला आहे.