पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक काही दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पंढरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. पोटनिवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
पोटनिवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची पूर्ण तयारी
पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक निष्पक्ष, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती तयारी केली आहे. या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढल्याने आवश्यक पोलीस बदोबस्त उपलब्ध केला जाणार आहे. मात्र, यावेळी मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
गुन्हेगारीच्या हद्दपारीबाबत प्रांत कार्यालयाकडे प्रस्ताव
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये. तसेच मागील निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नागरिकांवर नजर असणार आहे. तसेच एक किंवा दोन गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर निवडणुकीच्या काळामध्ये हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अशा प्रकारचा प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती कदम यांनी दिली.
हेही वाचा - कोरोना प्रादुर्भावामुळे प्रतिदिन केवळ दीड हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन
हेही वाचा - आता दररोज दीड हजार भाविकांनाच मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय