पंढरपूर (सोलापूर) - शहरातील टाळेबंदी शिथील करावी तसेच गेल्या वर्षभरापासून व्यापार्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, त्यामुळे व्यावसायिकांना दुकाने खुली करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीसाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी केली पंढरपूर तहसील कार्यालयासमोर अपक्ष उमेदवार शैलजा गोडसे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख यांनी एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे.
पंढरपूर शहरातील व्यापारी आक्रमक
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून 30 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुकाने बंद ठेवण्याचे दिलेले आदेश मागे घेण्याची मागणी पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांकडून होत आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक निमित्ताने राजकीय नेत्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मंगळवेढा, पंढरपूर शहरामध्ये दुकाने उघडण्याची परवानगी नसल्यामुळे व्यापारीही आक्रमक झाला आहे.
मोठ्या नेत्यांच्या सभेला गर्दी होते, तेव्हा कोरोना नाही का?
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राज्यातील वरिष्ठ नेते सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना गर्दी होते. त्यावेळेस कोरोना दिसत नाही, मात्र व्यापाऱ्यांची दुकाने खुली केल्यामुळे कोरोना वाढतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा प्रशासनाकडून टाळेबंदीमध्ये शिथीलता द्यावी व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी शैलजा गोडसे यांनी एक दिवसीय उपोषण सुरू केले.