ETV Bharat / state

निवृत्त कर्मचाऱ्याकडून एका लाखाच्या बदल्यात 17 लाखांची वसूली; खासगी सावकार अटकेत

महानगरपालिकेच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्याकडून 1 लाख रुपये कर्जाच्या मोबदल्यात 17 लाख रुपये वसूल करणाऱ्या एका खासगी सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

lender
lender
author img

By

Published : Aug 2, 2020, 4:30 PM IST

सोलापूर - शहरात खासगी सावकारकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदर बझार पोलीस ठाण्यांतर्गत एका खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल झाला. सोलापूर महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने शहरातील एका खासगी सावकाराकडून एक लाख रुपये घेतले होते. बजरंग प्रल्हाद अवताडे( वय 68 वर्षे, रा. निराळे वस्ती) या खासगी सावकाराने एका लाखाच्या बदल्यात दरमहा 12 हजार रुपयांप्रमाणे सतरा लाख रुपये वसूल केल्याचे उघड झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने 2008 साली आरोपी बजरंग अवताडेकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. 2013 साली त्या निवृत्त कर्मचाऱ्याने व्याजासहित मुद्दल देखील परत दिली. मात्र, आरोपी सावकराने दमदाटी करत व्याज आकारणी सुरूच ठेवली. 2014पासून आजतागायत दरमहा 12 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख रुपयांच्या बदल्यात 17 लाख रुपये वसूल केले आहे.

शेवटी या खासगी सावकराच्या जाचाला कंटाळून पीडित निवृत्त कर्मचाऱ्याने शुक्रवारी (दि. 31 जुलै) सायंकाळी सदर बझार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावर तत्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी ताबडतोब आरोपी सावकाराच्या मुसक्या आवाळल्या. आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

खासगी सावकाराकडून 13 बँक पासबूक जप्त, आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बजरंग अवताडे याच्याकडून बँकेचे 13 पासबुक जप्त करण्यात आले आहे. तपासामध्ये आणखी 13 कर्जदारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. 17 लाखांच्या वसुलीचा आकडा वाढून कोटीच्या घरात जाऊ शकतो.

विविध गुन्ह्यात आत्तापर्यंत 13 खासगी सावकार अटकेत

अमोल जगताप आत्महत्या प्रकरणानंतर खासगी सावकरांची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत. अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात 5 खासगी सावकरांना अटक करण्यात आली आहे. तर संतोष श्रीराम प्रकरणात 5 खासगी सावकारांना अटक केली आहे तर, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी प्रकरणात दोन आरोपी अटक आहेत. सदर बझार येथेही एका खासगी सावकाराला अटक केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.