सोलापूर : वारंवार सूचना देऊन देखील कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार दर्शविल्याने, होटगी रोडवरील 'युगंधर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल'वर सोलापूर महापालिकेच्या वतीने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, याकरता शहरातील काही रुग्णालये ताब्यात घेण्यात आली होती.
पालिका प्रशासनाकडून कोविड-१९ रुग्णांवर तात्काळ उपचार झाले पाहिजेत अशा सूचना वारंवार देऊनही होटगी रोड येथील युगंधर मल्टी-स्पेशलिटी रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब सोलापूर महापालिकेच्या निदर्शनास येताच, कोविड-१९ सेंटरचे नियंत्रक डॉ.धनराज पांडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा संबंधित रुग्णालयावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कोरोना रुग्णावर उपचार करण्यास असमर्थता दाखवणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने, इतर खासगी याबाबतची चर्चा चांगलीच रंगली आहे.
पुढील काळामध्ये कोविड-19 रुग्णावर उपचारास नकार देणाऱ्यावर रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही धनराज पांडे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा : सांगोला नगरपरिषदेमार्फत "थर्मल स्क्रिनिंग" पाठोपाठ संपूर्ण शहराचं "ऑक्सिजन स्क्रिनिंगही पूर्ण