सोलापूर - कोरडा दुष्काळ हटविण्यासाठी टाटा धरणातील पाणी उपयुक्त ठरणार आहे. ते पाणी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यासाठी शासनाने कृती करावी. वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर करण्यापेक्षा आता सूर्य, हवा यांचा वापर करून वीज निर्मिती करावी. धरणांचे पाणी इतर कामांसाठी वापरले जावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
हेही वाचा-शिरुर शहरातून भाजप अध्यक्ष अमित शाहंची रॅली
करमाळा शहरातील सुभाष चौकात वंचित बहुजन आघडीचे उमेदवार अतुल खुपसे यांच्या प्रचारासाठी ॲड.आंबेडकर यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विजयराव मोरे, उमेदवार अतुल खुपसे, सुभाष ओहोळ, देवा लोंढे उपस्थित होते.
डाकू लोकांच्या हातात सत्ता देणे धोक्याचे
सर्वसामांन्य जनतेच्या चेहऱ्यावर हसू ठेवणारे सरकार असावे लागते. मात्र, अलीकडील सरकारच्या कारभारामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत. सर्वसामान्यांचा आवाज दाबला जाताना गरजेवेळी माणसांना मदतीचा हात द्यायला कोणीही तयार नाही. चालू सरकार हे मागील सरकारचा इतिहास मांडत आहेत. मात्र, या सरकारने त्यांच्या पाच वर्षात काय केले. याचा आराखडा मांडला पाहिजे. तसेच डाकू लोकांच्या हातात सत्ता देणे धोक्याचे आहे. आता विकासासाठी आंदोलने उभारणाऱ्या आंदोलनकर्त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली.
बेरोजगारीचा प्रश्न
शासनकर्ते केवळ भांडवलदारांचे हित जोपासत आहेत. दुष्काळ व पूरस्थितीत सरकारने ठोस कृती केली नाही, बेरोजगारी वाढत आहे, एक लाख रुपयाच्या पुढील बँकेतील रकमा असुरक्षित आहेत. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांना आठ तासच ड्युटी असावी. त्यामुळे आणखी आवाश्यकतेने पोलीस पदावर सात लाख बेरोजगरांना संधी मिळेल, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
अदिवासी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष
आदिवासी समाजाच्या विकासाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वैनगंगा नदीला पूर आल्यावर चार अदिवासी तालुके अडचणीत होते. मात्र, त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. अदिवासींबाबत ही भुमिका चुकीचा आहे. असेही आंबेडकर यांनी म्हटले. दरम्यान, सदर सभा भर दुपारी दोन वाजता असूनही श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महिलांची संख्या मोठी होती. ॲड. आंबेडकर यांच्या सभेनंतर वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.