सोलापूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. महापालिकेच्यावतीने आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांना पीपीई कीट, ग्लोव्ज, मास्कचे वाटप केले आहे. आशा वर्कर या स्वंयसुरक्षा कीट घालून सर्वेक्षण करत आहेत.
सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ज्या भागात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत, त्या भागात आशा वर्करच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. या भागात 125 आशा वर्कर या सर्वेक्षण करत आहे.
आशा वर्कर सोबतच आरोग्य विभागातील कर्मचारी देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम करत आहे. या सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर व कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाधन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच थर्मामिटर देऊन प्रत्येकांची तपासणी देखील करण्यात येत आहे. 125 आशा वर्करसाठी पुर्नःवापरता येणारे पीपीई कीट, 145 थर्मामिटर जवळपास सात हजार हातमोजे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.