करमाळा (सोलापूर) - रोपळे कव्हे या गावामध्ये गतवर्षी ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. पावसाच्या पाण्याने ओढा तुडुंब भरला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, केम गावचे माजी सरपंच अजित तळेकर आणि रोपळे गावचे सरपंच तात्यासाहेब घोडगे यांच्या हस्ते तुडुंब भरलेल्या ओढ्यातील पाण्याचे पूजन आले. त्या ओढ्याला ‘विजय गंगा’, असे नामकरण यावेळी करण्यात आले.
रोपळे गावातील नाम फाउंडेशनच्या सहकार्याने व धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओढण्याचे काम सुरू होते. त्याच्या तांत्रिक कामासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पोकलेन मशीन दिली होती. त्यानंतर रोपळे गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून त्या मशीनला डिझेल पुरवले होते. त्यानंतर या ओढ्याचे काम पूर्ण झाले होते. आज पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये पाणीसाठा झाल्यामुळे रोपळे कव्हे गावातील ग्रामस्थ आनंदित झाले. त्यामुळे या ओढ्यातील पाण्याचे पूजन करून मोहिते कुटुंबाने पोकलेन मशीन देऊन त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्यामुळे ओढ्याचे पूर्ण झाले. त्यामुळे ओढ्याचे नामकरण विजय गंगा असे नाव दिले गेले असे कार्यक्रमाप्रसंगी बोलताना रोपळे गावचे सरपंच तात्यासाहेब गोडगे यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, केम गावचे माजी सरपंच अजित तळेकर, रोपळे गावचे सरपंच तात्यासाहेब गोडगे, उपसरपंच तानाजी दास, तंटामुक्ती अध्यक्ष शरद पाटील, पंजाबराव पाटील, जगदीशराजे निंबाळकर, श्रीपाद दळवे, निलेश जाधव, वैभव जाधव, आदम मुलाणी, कुंडलिक कानडे, ख्वाजा मुलाणी, कलीम मुलाणी, अण्णा पवार, अर्जुन जाधव, चैतन्य साळवे, निखिल जगताप, झुंबर मेहेर, सोहेब मुलाणी, जावेद मुलाणी आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.