ETV Bharat / state

संचारबंदी नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 839 जणांवर कारवाई - पंढरपूर कोरोना अपडेट

संचारबंदीच्या विविध कारवाईत 1 लाख 86 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांनी दिली.

संचारबंदी
संचारबंदी
author img

By

Published : Aug 13, 2020, 8:41 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - तालुक्‍यासह शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 7 ऑगस्टपासून संचारबंदी घोषित केली आहे. संचारबंदी सुरू असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विविध कारवाईत 1 लाख 86 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या पहिल्याच दिवसापासून शहरात कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शहरात संचारबंदी कालावधीत दूध, रुग्णालये व मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

शहरात संचारबंदीच्या 7 ते 13 ऑगस्ट या कालावधीत मास्क न वापरणे, दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे, चार चाकी वाहनांत तीनपेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान उघडे ठेवणे, दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती असणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे आदी प्रकारांमुळे 839 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 86 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे डॉ. कवडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.