सोलापूर : विमानसेवेच्या मार्गात चिमणी अडथळा येत असल्याने आजपासून या अनधिकृत चिमणीचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र राजकारण करून सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडून शेतकरी, कामगारांना उद्धवस्त करण्याचा आरोप कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर केला. या आधी सोलापूरमध्ये किंगफिशर कंपनी मार्फत विमान सेवा उपलब्ध होती. नियमितपणे चालणारी सेवा का बंद पडली? असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी विचारला. चिमणी पाडण्याची भूमिका ही शेतकरी कामगारांच्या विरोधात आहे. त्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग करून शेतकरी कामगारांसाठी माकप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली.
माकपच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात : सोलापुरात अनेक दिवसापासून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी महापालिका प्रशासन अग्रेसर राहिले आहे. दोन दिवसापासून कारखान्याच्या परिसरात जमावबंदी व मध्यरात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पहाटे चारच्या सुमारास हजारोंच्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अशा वेळी शेतकरी कामगारांच्या समर्थनार्थ व महापालिका प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याकडे आगेकूच केली. यावेळी पोलिसांनी माकपचे जिल्हा सचिव अँड एम एच शेख व कॉ युसूफ शेख मेजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांना चकवा देत काढला मोर्चा : माकपचे जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रात्रभर कार्यकर्त्यांनी जागरण केले. सकाळी पोलिसांना चकवा देत लाल झेंडे घेऊन पालिका व पोलीस प्रशासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. यावेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. रस्त्यावर ठिय्या मांडताच पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात : एम. एच शेख, युसुफ मेजर शेख, व्यंकटेश कोंगारी, अँड अनिल वासम, विल्यम ससाणे, बापु साबळे, विक्रम कलबुर्गी, हसन शेख, दाऊद शेख, नरेश दुगाने, मुरलीधर सुंचु, अकील शेख, बाबु कोकणे, विजय हरसुरे, अप्पाशा चांगले, वसीम मुल्ला, मधुकर चिल्लाल, सनी कोंडा, सौदप्पा पेद्दी, युसुफ शेख, बालाजी गुंडे, महिबूब मनियार, जावेद सगरी, राजेश काशीद, बजरंग गायकवाड, नितीन कोळेकर, नितीन गुंजे, अस्लम शेख, सुजित जाधव, हुसेन शेख, अनिल घोडके, प्रकाश कुऱ्हाडकर, मल्लिकार्जुन बेलीयार,गोविंद सज्जन, डेव्हिड शेट्टी, दिनेश बडगू, अफसर शेख, बालाजी तुम्मा, कुरमेश म्हेत्रे, योहान सातालोलु, आसिफ पठाण, रफिक काझी, किशोर मेहता, शाम आडम, नरेश गुल्लापल्ली, नानी माकम, अभिजीत निकंबे, बाललराज म्हेत्रे, प्रभाकर गेंट्याल, रविंद्र गेंट्याल, राजू गेंट्याल, शहाबुद्दीन शेख, शिवा श्रीराम आदींसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केले आहे.
हेही वाचा -