ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीत पोलीस खाते अव्वल, सात महिन्यात सहा पोलीस अटकेत - सोलापूर पोलीस बातमी

सोलापूर शहर व जिल्ह्यात जानेवारी, 2021 ते जुलै 2021 दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 16 कारवाया केल्या आहेत. त्यापैकी पाच कारवाया या पोलीस खात्याशी संबंधित असून याप्रकरणी सहा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली आहे.

लाच लूचपत प्रतिबंधक विभाग
लाच लूचपत प्रतिबंधक विभाग
author img

By

Published : Jul 11, 2021, 7:29 PM IST

Updated : Jul 11, 2021, 7:48 PM IST

सोलापूर - शहर व जिल्ह्यात जानेवारी, 2021 ते जुलै 2021 दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 16 कारवाया केल्या आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली आहे. यात पाच करावाया पोलीस खात्याबाबत झाल्या असून सहा पोलिसांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाच घेताना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीत पोलीस खाते अव्वल असल्याचे दिसून येत आहे.

माहिती देताना पोलीस उपअधीक्षक

सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अधिकाऱ्याना साडेसात लाख रुपयांची लाच घेताना कारवाई शुक्रवारी (दि. 9 जुलै) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रमाणिकपणे काम करण्याच्या सक्त सूचना दिल्या असताना देखील काही भ्रष्ट पोलीस अधिकरी व कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र दिसत आहे.

लाच घेणाऱ्या पोलिसांवर कारवाया झाल्या 5; मात्र अटक झाले 6 पोलीस

गडचिरोलीहून बलदी होऊन आलेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यामुळे सोलापूर शहर पोलीस खाते शिस्तबद्धपणे काम करत आहे. कामात कुचराई करणाऱ्या अनेक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी अनेक उपाययोजना केल्या. दुसरीकडे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. इतके कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी असूनही सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक यांच्या यादीत पोलीस खात्याचे नाव अव्वल आले आहे. जानेवारी 2021 पासून जुलै 2021 पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोलापुरात एकूण 16 कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये 5 कारवाया एकट्या पोलीस खात्याच्या आहेत. यात सहा पोलिसांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर न्यायालयात सुनावणीही सुरू आहे.

साडेसात लाख रुपयांची लाच घेणारे ते दोन्ही अधिकारी निलंबित

मुरूम उपसा प्रकरणात आरोपीला मदत करतो म्हणून तब्बल साडेसात लाखांची लाच मागणाऱ्या सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार व सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, या दोघांना जुना पुना नाका येथे शुक्रवारी (दि. 9 जुलै) अटक करण्यात आली होती. अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली. शनिवारी (दि. 10 जुलै) दोघा पोलिसांना पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. शनिवारी (दि. 10 जुलै) रात्री उशिरा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दोघांना निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहे.

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षकाकडे पोलीस ठाण्याचा पदभार

सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक यांना लाच घेताना अटक झाली होती. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पदभार कोणाकडे देणार याची उत्सुकता लागली होती. शनिवारी (दि. 10 जुलै) रात्री अश्विनी भोसले या महिला पोलीस अधिकाऱ्याची सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. सोलापुरात सध्या सात पोलीस ठाणे आहेत. आजतागायत या सातही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नव्हती. सोलापूर पोलीस आयुक्तालय 1992 साली स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एका महिला पोलीस निरीक्षकाला पोलीस ठाण्याच्या चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - साडेसात लाखांची मागितली लाच; दोन पोलीस अधिकाऱ्यांना सोलापुरात रंगेहाथ अटक

Last Updated : Jul 11, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.