ETV Bharat / state

माढ्यात पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या - solapur new news

सोल्हापूर जिल्ह्याती माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्सटेबल सुरेंद्र कडधोंड यांनी पोलीस वसाहतीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

पोलिस कॉन्स्टेबल सुरेंद्र कडधोंड
author img

By

Published : Sep 16, 2019, 12:44 PM IST

सोलापूर - माढा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय 30) यानी आत्महत्या केली आहे. सुरेंद्र यांनी सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्रीच्या सुमारास माढा शहरातील पोलीस वसाहतीत ही घटना घडली.

पोलिस कॉन्स्टेबल सुरेंद्र कडधोंड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

सुरेद्र कटकधोंड हे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून माढा पोलीस ठाण्यामध्ये मे महिन्यात रुजू झाले होते. ते पोलीस वसाहतीतील आपल्या खोलीत रहात होते. घटनेच्या वेळी सुरेंद्र एकटेच खोलीत होते. त्यांची पत्नी व दोन मुले वसाहती बाहेरील प्रागंणात बसले होते. सुरेंद्र यांनी हॉल मध्ये साडीच्या मदतीने फॅनला गळफास घेतला. पोलीस कॉलनीत असलेल्या महिलांनी सुरेंद्र पख्याला लटकत असल्याचे पाहिल्यानंतर ही घटना त्यांच्या पत्नीसह माढा पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, दरम्यान पोलिस ठाण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरुन 12 ऑगस्टला सुरेंद्र यांची एका पोलिस अधिकाऱ्यांशी कुरबुर झाली होती. त्यानंतर ते गैरहजरच राहिले होते, अशी चर्चा केली जात आहे.

घटना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यानी घटना स्थळी भेट दिली. सुरेद्र यांच्या पश्चात तिन वर्षाची मुलगी, पाच वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. ते मुळचे बार्शी तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहेत.

Intro:
mh_sol_01_police_suside_7201168
माढ्यात पोलिसाची आत्महत्या,
सुरेंद्र कटकधोंड यांनी गळफास लावून केली आत्महत्या
सोलापूर-
माढा पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलिस कान्सटेबल सुरेंद्र अजंता कटकधोंड(वय 30) यानी आत्महत्या केली आहे. सुरेंद्र यांनी सिलींग पंख्याला साडी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास माढा शहरातील पोलिस वसाहतीत ही घटना घडली आहे.Body:सुरेद्र कटकधोंड हे पंढरपुर शहर पोलिस ठाण्यातुन माढा पोलिस स्टेशन मध्ये मे महिन्यात रुजु झाले होते. ते पोलिस वसाहतीतील आपल्या खोलीत रहात होते. घटनेच्या वेळी सुरेंद्र हे एकटे खोलीत होते तर त्यांची पत्नी व दोन मुले वसाहती बाहेरील प्रागंणात बसले होते.
सुरेंद्र यांनी हॉल मध्ये साडी च्या मदतीने फॅनला गळफास घेतला.पोलिस काॅलनीत असलेल्या महिलांना सुरेंद्र हे पख्याला लटकत असल्याचे पाहिल्यानंतर ही घटना त्यांनी पत्नी सह माढा पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान पोलिस स्टेशन मध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ता च्या कारणावरुन 12 ऑगस्ट रोजी सुरेंद्र व एका पोलिस अधिकार्यांशी कुरबुर झाली होती.त्यानंतर तो गैरहजरच राहिला होता.अशी कुजबूज व चर्चा समोर आली आहे.

घटना समजताच पोलिस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यानी घटना स्थळी भेट दिली.सुरेद्र यांच्या पश्चात तिन वर्षाची मुलगी,पाच वर्षाचा मुलगा,पत्नी,आई,वडील,भाऊ असा परिवार असुन ते मुळचे पांगरी ता.बार्शी येथील रहिवासी आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.