ETV Bharat / state

पालखी सोहळ्यात जमावबंदी आदेशाचा भंग, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज; 74 जणांवर गुन्हे दाखल - Palkhi ceremony In huljanti

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. असे असताना देखील रविवारी संध्याकाळी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रा काढण्यात आली होती.

Police baton charge at Palkhi ceremony In huljanti mangalwedha
पालखी सोहळ्यात जमावबंदी आदेशाचा भंग, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज; 74 जणांवर गुन्हे दाखल
author img

By

Published : Nov 16, 2020, 7:29 PM IST

Updated : Nov 16, 2020, 7:49 PM IST

सोलापूर - कोरोनाच्या काळात बंद असलेली मंदिरे अखेर मोठ्या विश्रांतीनंतर उघडण्यात आली आहे. राज्यातील सर्वच देवस्थानांना नियम अटींचे पालन करत मंदिरांची दारे उघडण्यात यावी, अशा सक्त सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. परंतु मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे जमावबंदीचा आदेश तोडल्यामुळे पालखी यात्रेत गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान पोलिसांनी हा सौम्य लाठीचार्ज केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. असे असताना देखील रविवारी संध्याकाळी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रा काढण्यात आली होती.

लखी सोहळ्यात जमावबंदी आदेशाचा भंग, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज...

यामुळे केला पोलिसांनी लाठीचार्ज

शेकडो भाविकांच्या संख्येनं गावकरी व भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा सुरू असताना पोलिसांनी गावकऱ्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. पण, गर्दी वाढतच चालली होती. यावर नियंत्रण आणणे कठीण होत चालले होते. गर्दीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो. नियंत्रणात येत असलेली महामारी आणखीन वाढू शकते, याची भीती पोलीस प्रशासनाला होती. गर्दीला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

74 जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पालख्यासोबतचे भाविक, यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह 74 जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची फिर्याद गुप्तवार्ता विभागाचे राजकुमार ढोबळे यांनी दिली आहे.

कोरोनाची साखळी वाढू नये म्हणून शासनाने जमावबंदीचा आदेश दिल्यामुळे तालुक्यांमध्ये गैबीपीर उरूस, गणेशोत्सव, नवरात्र, लक्ष्मी दहिवडी येथील यात्रा, हुन्नूर येथील भेट सोहळा असे तालुक्यात होणारे मोठे कार्यक्रम रद्द झाले होते.

काय आहे इतिहास...

दिपावली पाडव्याच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया यात्रेदरम्यान या परिसरात शिलवंती (उमरगा), बिरोबा (शिरढोण), विठोबा (सोन्याळ, जत), जकाराया (येणकी), बिराप्पा (जिरअंकलगी), बिरोबा (हुन्नूर), मड्डी जकराया, महालिंगराया (हुलजंती), या गावातील ग्रामदैवताच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा गावाजवळील ओढ्यात दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षीच्या या सोहळ्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. याशिवाय अनेकांनी तोंडाला मास्क लावला नाही व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दलचा ठपका ठेवून देवस्थान कमिटी आणि भेटीसाठी आलेल्या पालखीसोबतच्या भाविकांसह एकूण 74 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Last Updated : Nov 16, 2020, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.