सोलापूर PM Modi in Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं. यावेळी सभेत बोलताना पंतप्रधान मोदी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करत म्हणाले की, "पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत आहे. 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी 11 दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली. आज 1 लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृहप्रवेश होईल. माझा आनंद वाढणार आहे. सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणारआहेत. आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकापर्ण झालं."
मोदी झाले भावूक : पुढं बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं", असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले. ते भावूक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, "तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी."
देशात 'गरिबी हटाओ'चे नारे मात्र गरिबी हटली नाही : यावेळी गरिबीवरुन विरोधकांवर टिका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, " गरिबांचं कल्याण हे आमचे ध्येय आहे. तुम्ही मोठी-मोठी स्वप्न बघा. छोटी स्वप्न बघू नका. तुमचं स्वप्न माझा संकल्प आहे. ही मोदींची गॅरंटी आहे. शहरात लोकांना भाड्यानं रहावं लागू नये, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. आमच्या देशात गरीबी हटावचे नारे दिले. पण गरिबी हटली नाही. अर्धी भाकरी खाऊ, असं सांगितलं जायचं, अरे पण अर्धी भाकरी का? पूर्ण भाकरी खाऊ. महाराष्ट्रातील साताऱ्याचे लक्ष्मण राव यांचं माझ्या जीवनात महत्वाचं स्थान राहिलंय. गरिबांच्या नावावर योजना बनवल्या जायच्या. पण हक्क त्यांना मिळायचा नाही. पहिल्या सरकारची नियत, नीती आणि निष्ठा नव्हती. आमची निष्ठा गरिबांसाठी आहे."
हेही वाचा :